उद्देश
मान्यताप्राप्त राज्य/केंद्र शासकीय संस्था वा वैधानिक/तांत्रिक मंडळ अथवा शासनाचे प्रशिक्षण खाते इ. द्वारे देऊ करण्यात येणारे प्रमाणपत्र/पदविका मिळवून देणारे, 6 महिने ते 3 वर्षे कालावधीचे व्यवसाय/कौशल्य विकास शिक्षणक्रम. सामान्यतः औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (आयटीसी) आणि पॉलिटेक्निक संस्था देऊ करत असलेले शिक्षणक्रम पात्रता निकषांमध्ये बसू शकतात. रोजगाराभिमुखतेचा विचार करता बँक यांमध्ये अन्य कौशल्यविकास कार्यक्रमांचादेखील समावेश करण्यास मुक्त आहे.
कर्जाकरता विचारात घेतले जाणारे खर्च
- शासन /शासननियुक्त अधिकरणांनी निर्धारित केलेले शिक्षण/शिक्षणक्रम शुल्क
- परीक्षा / ग्रंथालय / प्रयोगशाळा शुल्क
- सुरक्षा ठेव
- पुस्तके / साधने / उपकरणे / गणवेश खरेदी
- शिक्षणक्रम पूर्ण करण्याकरता बँकेला आवश्यक वाटणारे अन्य कुठलेही वाजवी खर्च
- खाजगी संस्थेच्या शिक्षण शुल्काच्या बाबतीत, ते शासन /शासननियुक्त अधिकरणांनी निर्धारित केलेले नसल्यास, सदर खर्च समान शिक्षणक्रमाकरता शासनाने विहित केलेल्या शुल्काच्या 125% पर्यंत मर्यादित असणे आवश्यक आहे.
कमाल रक्कम
निष्कर्षित खर्च भागवण्याकरता खालील मर्यादांअंतर्गत, गरजेनुसार अर्थसाहाय्य पुरवण्याचा विचार केला जाईल:
- 1 वर्षापर्यंतचा कालावधी असलेल्या शिक्षणक्रमांसाठी – रू. 50,000/-
- 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी असलेल्या शिक्षणक्रमांसाठी – रू. 1,50,000/-
बँक तिच्या मर्जीनुसार, नामांकित संस्था देऊ करत असलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमांच्या बाबतीत त्यांचे स्वरूप व रोजगाराभिमुखता लक्षात घेऊन आणि कर्जरकमेसाठीच्या पात्रतेचा विचार करून 1 वर्षापर्यंतचा कालावधी असलेल्या शिक्षणक्रमांसाठी रू. 75,000/- आणि 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी असलेल्या शिक्षणक्रमांसाठी रू. 2.00 लाख अशी मर्यादा देऊ करण्याचा विचार करू शकेल.
पात्रता
विद्यार्थ्याची पात्रता
- विद्यार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी राज्य/केंद्रीय बोर्डाची 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने रोजगाराभिमुख असलेल्या शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण शिक्षणक्रमामध्ये प्रवेश प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.
सहकर्जदार
सहसा विद्यार्थ्याचे पालक/सांभाळकर्ते त्याचे सहकर्जदार असणे आवश्यक असते. विवाहित व्यक्तीच्या बाबतीत तिचे सहकर्जदार तिचा वैवाहिक जोडीदार अथवा पालक वा सासू-सासरे असू शकतात.
परतफेड
शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर खालीलप्रमाणे अधिस्थगन कालावधीनंतर परतफेडीस सुरूवात होईल:-
वर्षापर्यंतचा कालावधी असलेल्या शिक्षणक्रमांसाठी 1-
शिक्षणक्रम पूर्ण झाल्यानंतर 6 महिने
1 वर्षापेक्षा अधिक कालावधी असलेल्या शिक्षणक्रमांसाठी -
शिक्षणक्रम पूर्ण झाल्यानंतर 12 महिने. मात्र, मात्र, विद्यार्थ्याला त्याचा/तिचा शिक्षणक्रम समाप्त झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत रोजगार मिळाल्यास समान मासिक हप्ते अलिकडे घेतले जातील व रोजगार मिळण्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर सुरू करणे निश्चित केले जाईल.
अधिस्थगन कालावधीनंतर कर्जाची खालीलप्रमाणे समान मासिक हप्त्यांच्या स्वरुपात परतफेड केली जाईल:
1 वर्षापर्यंतचा कालावधी असलेला शिक्षणक्रम - 3 ते 5 वर्षे
1 वर्षापेक्षा अधिक कालावधी असलेला शिक्षणक्रम - 5 ते 7 वर्षे
व्याजदर येथे क्लिक करा
टीप:-
अधिस्थगन कालावधीमध्ये व्याज भरत राहिल्यास अधिस्थगन कालावधी पूर्ण होईपर्यंत बँक व्याजामध्ये 1% सवलत देऊ करू शकेल.
मात्र मान्य केल्याप्रमाणे अधिस्थगन कालावधीमध्ये व्याज न भरल्यास वर उल्लेखलेले सामान्य व्याज कुठल्याही सवलतीविना कर्जाच्या पहिल्या उचलीच्या तारखेपासून आकारले जाईल.
मार्जिन काही नाही
सदस्यत्व
अर्जदार व सहअर्जदारांकरता नियमित सदस्यत्व, मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम.
हमीदाराकरता नाममात्र सदस्यत्व रू. 100/-.
तारण
दोन्ही पालक विद्यार्थ्यासह सहकर्जदार म्हणून कर्जाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करतील.
सेवा शुल्क काही नाही