भारतामध्ये व परदेशांतील उच्चशिक्षणासाठी शैक्षणिक कर्जयोजना
उद्देश
भारतातील शिक्षण (सूचक यादी)
- मान्यताप्राप्त महाविद्यालये/विद्यापीठे यांनी चालवलेले यूजीसी/शासन/एआयसीटीई/एआयबीएमएस/आयसीएमआर इ. द्वारे मान्यताप्राप्त पदवी/पदव्युत्तर आणि पदव्युत्तर पदविका मिळवून देणारे शिक्षणक्रम
- आयसीडब्लूए, सीए, सीएफए इ. सारखे शिक्षणक्रम
- आयआयएम, आयआयटी, आयआयएससी, एक्सएलआरआय, एनआयएफटी, एनआयडी इ. संस्थांमध्ये चालवले जाणारे शिक्षणक्रम
- शिक्षण भारतामध्ये घेतले जाणार असल्यास नागरी उड्डयन/जहाज वाहतूक महासंचालक यांनी मान्यता दिलेले एरोनॉटिकल, पायलट प्रशिक्षण, शिपिंग इ. नियमित पदवी/पदविका शिक्षणक्रम
- नामांकित परदेशी विद्यापीठांनी मान्यता दिलेले व भारतामध्ये देण्यात येणारे शिक्षणक्रम.
वरील यादी सूचक आहे. बँक, तांत्रिक/व्यावसायिक पदवी/पदव्युत्तर पदवी/पदविका मिळवून देणाऱ्या व मान्यताप्राप्त संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अन्य रोजगाराभिमुख शिक्षणक्रमांनादेखील सदर योजने अंतर्गत मान्यता देऊ शकेल.
परदेशी शिक्षण:-
- पदवी : नामांकित विद्यापीठ देऊ करत असलेले रोजगाराभिमुख व्यावसायिक/तांत्रिक शिक्षणक्रम.
- पदव्युत्तर : एमसीए, एमबीए, एमएस इ.
- सीआयएमए-लंडन, अमेरिकेतील सीपीए इ. चालवत असलेले शिक्षणक्रम
- भारतातील/परदेशातील रोजगाराच्या उद्देशाने भारतातील/परदेशातील सक्षम नियामक मंडळांनी मान्यता दिलेले एरोनॉटिकल, पायलट प्रशिक्षण, शिपिंग इ. नियमित पदवी/पदविका शिक्षणक्रम.
कर्जाकरता विचारात घेतले जाणारे खर्च
- महाविद्यालय/शाळा/वसतिगृह यांचे शुल्क
- परीक्षा / ग्रंथालय / प्रयोगशाळा शुल्क
- परदेशातील शिक्षणाकरता प्रवासखर्च / स्थलांतर निधी
- विद्यार्थी कर्जदाराच्या विम्याचा हप्ता, लागू असल्यास
- सुरक्षा ठेव, इमारत निधी, संस्थेच्या देयके/पावत्यांचा आधार असलेली परत मिळण्याजोगी ठेव
- पुस्तके / साधने / उपकरणे / गणवेश खरेदी
- शिक्षणक्रम पूर्ण करण्याकरता आवश्यक असल्यास वाजवी किंमतीला संगणक खरेदी करणे
- शिक्षणक्रम पूर्ण करण्याकरता आवश्यक असलेले, अभ्यास दौरे, प्रकल्प, शोधनिबंध इ. अन्य खर्च
- कर्जाची आवश्यक रक्कम ठरवताना, विद्यार्थी कर्जदाराला शिष्यवृत्ती, फीमाफी इ. गोष्टी उपलब्ध असल्यास त्या विचारात घेतल्या जाऊ शकतील
- कर्जप्रकरणाचे मूल्यमापन करताना त्यात शिष्यवृत्तीच्या भागाचाही समावेश असल्यास शिष्यवृत्तीची रक्कम शासनाकडून प्राप्त होईल तेव्ही ती कर्जखात्यामध्ये जमा करण्याची खात्री करून घेतली जाऊ शकते.
भारतामध्ये व परदेशांतील उच्चशिक्षणासाठी शैक्षणिक कर्जयोजना कमाल रक्कम
- भारतातील शिक्षण : रू. 10.00 लाखपर्यंत
- परदेशातील शिक्षण : रू. 20.00 लाखपर्यंत
यांपैकी जी रक्कम कमी असेल ती.
पात्रता विद्यार्थ्याची पात्रता :-
- विद्यार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे
- त्याने एचएससी (10 अधिक 2 किंवा सममूल्य) शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रवेश परीक्षा/गुणवत्ताधारित निवडप्रक्रियेद्वारे भारतातील वा परदेशातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये उच्च शिक्षणाकरता प्रवेश मिळवलेला असणे आवश्यक आहे. मात्र, काही पदव्युत्तर शिक्षणक्रम अथवा संशोधन कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळण्याकरता निव्वळ पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेशपरीक्षा अथवा निवड हा निकष नसणे शक्य असते. अशा बाबतीत बँक स्वतःच्या निकषांवर शिक्षणक्रमाची रोजगारक्षमता आणि संस्थेची प्रतिष्ठा यांबाबत निवाडा करू शकेल.
सहकर्जदार
- सहसा विद्यार्थ्याचे पालक/सांभाळकर्ते त्याचे सहकर्जदार असणे आवश्यक असते. विवाहित व्यक्तीच्या बाबतीत तिचे सहकर्जदार तिचा वैवाहिक जोडीदार अथवा पालक वा सासू-सासरे असू शकतात.
परतफेड
अधिस्थगन कालावधी = शिक्षणक्रमाचा अवधी + कमाल 1 वर्ष.
मात्र, विद्यार्थ्याला त्याचा/तिचा शिक्षणक्रम समाप्त झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत रोजगार मिळाल्यास समान मासिक हप्ते अलिकडे घेतले जातील व रोजगार मिळण्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर सुरू करणे निश्चित केले जाईल.
कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यांवर 15 वर्षांमध्ये करणे आवश्यक असेल.
व्याजदर येथे क्लिक करा
मार्जिन
रू. 4.00 लाखपर्यंत – काही नाही
रू. 4.00 लाखपेक्षा अधिक -
भारतातील शिक्षण 5%
- परदेशातील शिक्षण 15%
- मार्जिनमध्ये शिष्यवृत्ती/साहाय्यक मोबदला समाविष्ट केला जाईल
- जेव्हा-जेव्हा प्रो रेटा तत्त्वावर कर्जवाटप केले जाईल, तेव्हा मार्जिन ईयर ऑन ईयर तत्त्वावर आणले जाईल.
- बहिर्दिश रेमिटन्स आमच्या परकीय चलन विभागामार्फत वळवले जाईल.
सदस्यत्व
- अर्जदार व सहअर्जदारांकरता नियमित सदस्यत्व, मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम.
- हमीदाराकरता नाममात्र सदस्यत्व रू.
तारण व हमीदार
- रू. 4.00 लाखपर्यंत
सहकर्जदार म्हणून पालक, निव्वळ वेतन/उत्पन्न रू. 15,000/- द. म. व त्यापेक्षा अधिक असलेले एक हमीदार
- रू. 4.00 लाखपेक्षा अधिक आणि रू. 7.50 लाखपर्यंत
सहकर्जदार म्हणून पालक, निव्वळ वेतन/उत्पन्न रू. 20,000/- द. म. व त्यापेक्षा अधिक असलेला एक हमीदार आणि कर्जरकमेएवढे ठोस आनुषंगिक तारण.
- रू. 7.50 लाखपेक्षा अधिक
सहकर्जदार म्हणून पालक, निव्वळ वेतन/उत्पन्न रू. 25,000/- द. म. व त्यापेक्षा अधिक असलेला एक हमीदार आणि कर्जरकमेएवढे ठोस आनुषंगिक तारण.
- सेवा शुल्क
काही नाही
व्याजदर येथे क्लिक करा
टीप:-
अधिस्थगन कालावधीमध्ये व्याज भरत राहिल्यास अधिस्थगन कालावधी पूर्ण होईपर्यंत बँक व्याजामध्ये 1% सवलत देऊ करू शकेल. मात्र मान्य केल्याप्रमाणे अधिस्थगन कालावधीमध्ये व्याज न भरल्यास वर उल्लेखलेले सामान्य व्याज कुठल्याही सवलतीविना कर्जाच्या पहिल्या उचलीच्या तारखेपासून आकारले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- ताजा फोटो, फोटो ओळखीचा पुरावा, पॅन कार्डाची छायाप्रत, अर्जदार व हमीदारांच्या निवासी पत्त्याचे पुरावे
- नियमित उत्पन्नाचा स्रोत असलेल्या पालक/सांभाळकर्त्यांचे मासिक व्याज भरण्यास समर्थन
- अन्य बँकांकडून कुठलेही शैक्षणिक कर्ज न घेतल्याची पुष्टी करणारे घोषणापत्र/शपथपत्र
- शिक्षणक्रम आणि प्रवेशप्रक्रियेचे तपशील नमूद केलेले विद्यापीठ / महाविद्यालय / संस्थेचे ऑफर लेटर
- पासपोर्टची प्रत (परदेशातील शिक्षणाच्या बाबतीत) किंवा ओळखीचा पुरावा
- ताज्या शैक्षणिक गुणपत्रिका.
अन्य
- विमा: शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता बँक मुदत जीवन विमा पॉलिसीची व्यवस्था करेल.
- क्षमता/ऐपत प्रमाणपत्र: अर्ज केल्यास बँक उच्चशिक्षणाकरता परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ऐपतीचे प्रमाणपत्र जारी करू शकेल. या कारणाकरता आवश्यकता भासल्यास अर्जदाराकडून आर्थिक व अन्य आधारभूत कागदपत्रांची मागणी केली जाईल.
- मुदतपूर्व परतफेड: परतफेडीच्या कालावधीमध्ये कुठल्याही वेळी संपूर्ण परतफेड केल्यास त्याकरता कुठलाही दंड लागू केला जाणार नाही.
- किमान वय: शैक्षणिक कर्जासाठी पात्र ठरण्याकरता विद्यार्थ्याच्या वयाबाबत कुठलेही विशिष्ट निर्बंध नाहीत. मात्र विद्यार्थी अज्ञान असल्यास व त्याच्या पालकांनी कर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास बँक तो/ती सज्ञान झाल्यानंतर त्यांच्याकडून संमतीपत्र घेईल.
तारण हे जमीन / इमारत / शासकीय सिक्युरिटीज / सार्वजनिक क्षेत्रांचे रोख / यूटीआयचे युनिट्स, एनएससी, केव्हीपी, आयुर्विमा पॉलिसी, सोने, विद्यार्थी/पालक/सांभाळकर्ते/अन्य कुठलाही त्रयस्थ पक्ष यांच्या नावे असलेल्या आमच्या बँकेतील ठेवी किंवा बँकेला स्वीकारार्ह असलेल्या अन्य कुठल्याही तारणाच्या रूपात आणि योग्य त्या मार्जिनसह स्वीकारले जाईल. त्रयस्थ पक्षाचे तारण/मालमत्ता गहाण ठेवल्यास सदर तारण/मालमत्तांच्या मालकाला हमीदार केले जाईल.
विद्यालक्ष्मी लिंक