उद्देश
योग्य/गुणवंत विद्यार्थ्यांना भारतात व परदेशांमध्ये उच्चशिक्षण घेण्याकरता आणि प्रवेश शुल्क, निवासव्यवस्था, शैक्षणिक साहित्य खरेदी करणे, प्रवासखर्च, पुस्तके, संगणक व संगणकाचे जोड इ. खरेदी करण्याकरता अर्थसाहाय्य पुरवणे.
भारतातील शिक्षण (सूचक यादी)
- मान्यताप्राप्त महाविद्यालये/विद्यापीठे यांनी चालवलेले यूजीसी/शासन/एआयसीटीई/एआयबीएमएस/ आयसीएमआर इ. द्वारे मान्यताप्राप्त पदवी/पदव्युत्तर आणि पदव्युत्तर पदविका मिळवून देणारे शिक्षणक्रम
- एमबीबीएस, वैद्यकशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण, तांत्रिक आणि अभियांत्रिकी शिक्षणक्रम इ.
- आयआयएम, आयआयटी, आयआयएससी, एक्सएलआरआय, एनआयएफटी, एनआयडी इ. संस्थांमध्ये चालवले जाणारे शिक्षणक्रम
- शिक्षण भारतामध्ये घेतले जाणार असल्यास नागरी उड्डयन/जहाज वाहतूक महासंचालक यांनी मान्यता दिलेले एरोनॉटिकल, पायलट प्रशिक्षण, शिपिंग इ. नियमित उच्च पदवी/पदविका व अन्य शाखांमधील पदवी/पदविका शिक्षणक्रम
नामांकित परदेशी विद्यापीठांनी मान्यता दिलेले व भारतामध्ये देण्यात येणारे शिक्षणक्रम.
परदेशी शिक्षण:-
भारतातील/परदेशातील रोजगाराच्या उद्देशाने भारतातील/परदेशातील सक्षम नियामक मंडळांनी मान्यता दिलेले एरोनॉटिकल, पायलट प्रशिक्षण, शिपिंग इ. नियमित पदवी/पदविका शिक्षणक्रम.
- पदवी : नामांकित विद्यापीठ देऊ करत असलेले रोजगाराभिमुख व्यावसायिक/तांत्रिक शिक्षणक्रम.
- पदव्युत्तर : एमसीए, एमबीए, एमएस इ.
- सीआयएमए-लंडन, अमेरिकेतील सीपीए इ. चालवत असलेले शिक्षणक्रम
कमाल रक्कम
भारतातील शिक्षण : रू. 10.00 लाखांपेक्षा अधिक व कमाल रू. 25.00 लाख पर्यंत
परदेशातील शिक्षण : रू. 20.00 लाखांपेक्षा अधिक व कमाल रू. 50.00 लाख पर्यंत
यांपैकी जी रक्कम कमी असेल ती.
पात्रता
सहकर्जदार:
सहसा विद्यार्थ्याचे पालक/सांभाळकर्ते त्याचे सहकर्जदार असणे आवश्यक असते. विवाहित व्यक्तीच्या बाबतीत तिचे सहकर्जदार तिचा वैवाहिक जोडीदार अथवा पालक वा सासू-सासरे असू शकतात व आई-वडील हयात नसल्यास भाऊ वा बहीण असू शकतात.
- विद्यार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे
- त्याने एचएससी (10 अधिक 2 किंवा सममूल्य) शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रवेश परीक्षा/गुणवत्ताधारित निवडप्रक्रियेद्वारे भारतातील वा परदेशातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये उच्च शिक्षणाकरता प्रवेश मिळवलेला असणे आवश्यक आहे. मात्र, काही पदव्युत्तर शिक्षणक्रम अथवा संशोधन कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळण्याकरता निव्वळ पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेशपरीक्षा अथवा निवड हा निकष नसणे शक्य असते. अशा बाबतीत बँक स्वतःच्या निकषांवर शिक्षणक्रमाची रोजगारक्षमता आणि संस्थेची प्रतिष्ठा यांबाबत निवाडा करू शकेल.
परतफेड
- 180 महिने समान मासिक हप्ते, अधिस्थगन कालावधीसह.
- अधिस्थगन कालावधी = शिक्षणक्रमाचा अवधी + 12 महिने.
- अधिस्थगन कालावधीमध्ये व्याज भरणे आवश्यक. व्याजामध्ये कुठलीही सवलत उपलब्ध नाही.
व्याजदर येथे क्लिक करा
सूचना: प्रस्तुत योजनेखाली मंजूर झालेले कर्ज व्याजातील सवलतीसाठी पात्र नाही.
मुदतपूर्व परतफेड अथवा कर्जसमाप्तीसाठी दंड
कर्जाचा परतफेड कालावधी सुरू झाल्यानंतर कर्जदार कुठलेही मुदतपूर्व परतफेड शुल्क द्यावे न लागता कुठल्याही वेळी पूर्ण परतफेड करू शकतो.
मार्जिन
- भारतातील शिक्षण 10%
- परदेशातील शिक्षण 20%
- जेव्हा-जेव्हा प्रो रेटा तत्त्वावर कर्जवाटप केले जाईल, तेव्हा मार्जिन ईयर ऑन ईयर तत्त्वावर आणले जाईल.
सदस्यत्व
रू. 25.00 लाखपर्यंतच्या कर्जाकरता - अर्जदार व सहअर्जदारांकरता नियमित सदस्यत्व व हमीदाराकरता नाममात्र सदस्यत्व.
रू. 25.00 लाखांपुढील कर्जाकरता - नियमित सदस्यत्व.
तारण व हमीदार.
- रु.25.00 लाख पर्यंत कर्ज- निव्वळ पगार/उत्पन्न रु. एक जामीन. दरमहा २५,०००/- आणि त्याहून अधिक
- रु.25.00 लाखापेक्षा जास्त कर्ज- निव्वळ पगार/उत्पन्न रु. एक जामीन. 30,000/- आणि त्याहून अधिक दरमहा किंवा दोन जामीन निव्वळ पगार/उत्पन्न रु. 20,000/- आणि त्याहून अधिक दरमहा.
- संपूर्ण कर्जरकमेएवढे आनुषंगिक ठोस तारण.
प्रक्रिया शुल्क
मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम + जीएसटी
हिस्सा
अर्जदार - मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम
हमीदार – रू. 1000/-
विमा
“विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्जाच्या रकमेएवढे आयुर्विमा संरक्षण असणे आवश्यक आहे. विम्याचा हप्ता ग्राहक त्याने निवडलेल्या पॉलिसी व त्याच्या ऐपतीनुसार कुठल्याही प्रकारे भरू शकतो (एकवेळ हप्ता, वार्षिक हप्ता इ.) सदर पॉलिसीचे हक्क बँकेच्या नावाने करणे आवश्यक आहे.”
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- रीतसर भरलेला विहित अर्ज
अर्जदार, सहअर्जदार व हमीदारांचे ताजे फोटो, फोटोओळखपत्र व निवासाचा पुरावा (विद्यार्थी अज्ञान असल्यास, तो अर्जदार/कर्जदार नसला तरी त्याचे ताजे फोटो, फोटोओळखपत्र व निवासाचा पुरावा आवश्यक)
- खालीलप्रमाणे (a) वा (b) यांच्या उत्पन्नाचा पुरावा:
- a) पगारदार नोकर: मागील 3 महिन्यांच्या वेतनचिठ्ठ्या आणि मागील 6 महिन्यांचे बँक विवरणपत्र, मागील 3 वर्षांचे प्राप्तिकर परतावे व फॉर्म 16 ए
- b) व्यवसायमालक/व्यावसायिक/स्वयंरोजगारी व्यक्तीः मागील 3 वर्षांचे ताळेबंद, नफा-नुकसान विवरणपत्र व प्राप्तिकर परतावे आणि व्यवसायाच्या खात्याकरता मागील 6 महिन्यांचे बँक विवरण पत्र.
- पक्का प्रवेश मिळाल्याचा पुरावा.
- शिक्षणशुल्क व अन्य खर्च (प्रवास, राहणे व खाणे) यांचा अंदाज
- शुल्काच्या पावत्या किंवा पैसे भरल्याचा पुरावा.
- विद्यार्थी उच्चशिक्षणाकरता परदेशी जात असल्यास पासपोर्ट, व्हिसा व संबंधित कागदपत्रांच्या प्रती.