Shopin

 दुकान,घर व गाळ्याच्या दुरुस्ती/नूतनीकरणासाठी कर्ज

  • उद्देश

    दुकान, घर व गाळा इ. च्या नूतनीकरणासाठी.

    कमाल रक्कम

    जास्तीत जास्त रु. 10.00 लाख (महानगरीय क्षेत्रे)/रु.6.00 लाख (इतर क्षेत्रांसाठी) (गृहनिर्माण कर्जदार आणि इतरांसाठी.)

    पात्रता

    कर्जदाराची घटना:- व्यक्ती, एकमालक संस्था, भागीदारी संस्था, प्रा. लि./लि. कंपनी इ.

    पात्रता परतफेड क्षमतेनुसार = परतफेड क्षमता * 100000 / समान मासिक हप्ता

    ज्यामध्ये,
    परतफेड क्षमता = निव्वळ मासिक उत्पन्न – (वजा) किमान हातात पडणारे वेतन –(वजा) अन्य कर्जांच्या वजावटी.

    अ. विद्यमान गृहकर्जधारकासंदर्भात घराची दुरुस्ती व नूतनीकरण , इतरांच्या बाबतीत - निव्वळ वेतन / उत्पन्नाचे 40% किमान निव्वळ पगार / उत्पन्न रू .11,000 आणि जास्तीत जास्त निव्वळ पगार / उत्पन्न रू .20,000 / -

    कर्जाची रक्कम सदनिक/घर, दुकान गाळ्याच्या बाजारमूल्याच्या 80% पेक्षा अधिक असणार नाही.

     


    परतफेड

    घराच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 84 महिन्यांचा समतोल हप्ता.

    दुकान / गाळा दुरुस्तीसाठी 120 महिन्यांचा समतोल हप्ता.

    व्याजदर

    येथे क्लिक करा

    मार्जिन

    10.00 लाख रुपयांपर्यंत - काहीही नाही

    दुकान / गाळा दुरुस्तीसाठी: - रु.10.00 लाखांपेक्षा जास्त - 25%

    दुकान / गाळा / घरासाठी सध्याच्या कर्जाच्या बाबतीत, एकूण कर्जाची रक्कम बाजार मूल्याच्या 80% पेक्षा जास्त नसावी.

    सदस्यत्व

    अर्जदार :-
    a) कर्ज रू. 1.00 लाखपर्यंत - नाममात्र सदस्यत्व
    b) कर्ज रू. 1.00 लाखपेक्षा अधिक - नियमित सदस्यत्व

    हमीदार: नाममात्र सदस्यत्व

    हमीदार

    एक हमीदार.

    मुख्य तारण

    मूळ समभाग प्रमाणपत्र, नोंदणीकृत खरेदीखत/करार, सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यास सदनिका/दुकानाची समन्यायी गहाणवट व अर्जदार/सदनिका मालक सदनिकेमध्ये राहात असणे आवश्यक..

    आनुषंगिक तारण

    काही नाही

    सेवा शुल्क

    सेवा मॅन्युअल शुल्कानुसार.

    हिस्सा

    मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम

    विमा

    फर्निचर/फिक्स्चर, उपकरणे आणि सदनिका/घर/दुकान/गाळा यांचा विमा.