उद्देश
- दवाखाना/शुश्रुषागृह, पॅथॉलॉजी लॅब, औषधाचे दुकान चालवण्याकरता मालकीतत्त्वावर जागा खरेदी करण्यासाठी. लागू असेल त्याप्रमाणे राज्य/केंद्र शासनाच्या परवाना/नोंदणी आवश्यकतांचे अनुपालन करण्याच्या अधीन.
- दंतवैद्यांकरता विविध प्रकारच्या दंतरोपणांकरता उपकरणे/यंत्रसामग्रीची खरेदी; अस्थिव्यंगतज्ज्ञांकरता विविध प्रकारच्या कमरेचे हाड/गुडघे/पाठीचा मणका इ. च्या रिप्लेसमेंट/रोपणाकरता उपकरणे/यंत्रसामग्रीची खरेदी इ.
- सामान्य बनावटीची वैद्यकीय उपकरणे, व्यावसायिक हत्यारे, अँब्युलन्स, संगणक, यूपीएस, सॉफ्टवेअर, फर्निचर/फिक्स्चर इ. च्या खरेदीकरता.
कमाल रक्कम
औषधांची खरेदी व वेतन आणि अन्य खर्च भागवण्याकरता ओव्हरड्राफ्ट सुविधा (रोख पत) रू. 5.00 लाख
व्यवसाय कर्ज योजनेअंतर्गत - रु.50.00 लाख
टीप :- एकत्रित कर्ज व सीसी रक्कम :- रू. 50.00 लाख.
पात्रता
कर्जदाराची घटना :-
व्यक्ती (अनुभवी वा नव्याने अर्हताप्राप्त नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक), भागीदारी संस्था/ प्रा. लि. कंपनी/ विश्वस्त संस्था – भागीदार, संचालक, विश्वस्त हे अर्हताप्राप्त नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असणे आवश्यक.
अर्जदार/ प्रवर्तकांकडे वैद्यकशास्त्रामधील मान्यताप्राप्त अर्हता असणे आवश्यक, जसे एमबीबीएस/ बीएएमएस/ बीडीएस/ बीएचएमस/फिजिओथेरपी/ औषधशास्त्र/रेडियॉलॉजी/पॅथॉलॉजी इ.
कर्जपात्रता खालील गोष्टीवर आधारित :-
- परतफेड क्षमता.
- डीएससीआर 1.5 पेक्षा अधिक.
- प्रकल्पखर्च वजा मार्जिन रक्कम
परतफेड
जागा खरेदीकरता – कमाल 120 महिने (अधिस्थगन कालावधीसह)
जागा खरेदीव्यतिरिक्त अन्य उद्देशांकरता – कमाल 84 महिने (अधिस्थगन कालावधीसह)
रू. 2.00 लाखपर्यंतच्या कर्जांसाठी - कमाल 60 महिने.
कमाल अधिस्थगन कालावधी प्रकल्प/प्रकरणाच्या गुणवत्तेवर आधारित राहील.
व्याजदर येथे क्लिक करा
मार्जिन
वैद्यकीय उपकरणे/यंत्रांच्या किंमतीच्या 10%.
जागा/संगणक/उपकरणे/नूतनीकरण/फर्निचर इ. च्या खर्चाच्या 25%
सदस्यत्व
अर्जदार व सहअर्जदार – नियमित सदस्य
हमीदार
a) रू. 25.00 लाखपर्यंत - नाममात्र सदस्यत्व
b) रू. 25.00 लाखांपुढे - नियमित सदस्यत्व
मुख्य तारण
- खरेदी करण्याच्या/बांधण्याच्या जागा/दवाखाना यांची समन्यायी गहाणवट.
- बँकेच्या अर्थसाहाय्यातून खरेदी करण्याची उपकरणे/यंत्रे/संगणकाचे जोडभाग/वाहन (अँब्युलन्स)/फर्निचर इ. तारण.
आनुषंगिक तारण व हमीदार कर्ज रू. 10.00 लाखपर्यंत :-
- ठोस व रोखीत रूपांतर करण्यायोग्य आनुषंगिक तारण कर्जरकमेच्या 25% वा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक.
- निव्वळ हातात पडणारे वेतन/निव्वळ नफा/निव्वळ उत्पन्न रू. 12,000/- द. म. असणारा एक हमीदार
रू. 10.00 लाखांपुढील कर्जाकरता :-
- ठोस व रोखीत रूपांतर करण्यायोग्य आनुषंगिक तारण कर्जरकमेच्या 50% असणे आवश्यक.
- निव्वळ हातात पडणारे वेतन/निव्वळ नफा/निव्वळ उत्पन्न रू. 15,000/- द. म. असणारे दोन हमीदार किंवा निव्वळ हातात पडणारे वेतन/निव्वळ नफा/निव्वळ उत्पन्न रू. 20,000/- द. म. असणारा एक हमीदार
सेवा शुल्क
सेवा शुल्क मॅन्युअल नुसार
हिस्सा
मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम
विमा
सर्व तारण/गहाण मालमत्तांचा सर्वसमावेशक विमा
अन्य सूचना
पेमेंट थेट पुरवठादार/विक्रेत्यांना केले जाईल. जागेच्या बांधकामाच्या बाबतीत, आराखड्याच्या पडताळणीनंतर कर्ज टप्प्या-टप्प्याने वाटप केले जाऊ शकेल. कर्जाची प्रतिपूर्ती सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र, पेमेंटचा पुरावा आणि देयके/पावत्यांच्या आधारे मान्य केली जाईल.