सदस्यत्व
अर्जदार व सहअर्जदार
मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम
हमीदार - शून्य
मुख्य तारण :अर्थसाहाय्य देण्यात आलेली सदनिका/घराची गहाणवट व विमा.
आनुषंगिक तारण : एलआयपी, एनएससी, एफडीआर इ., असल्यास.
कायदेशीर शुल्क व मुद्रांक शुल्क : लागू असल्याप्रमाणे.
स्वतःचा हिस्सा
मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम
कागदपत्रे
- ताजा फोटो, फोटो ओळखीचा पुरावा, पॅन कार्डाची छायाप्रत, अर्जदार व हमीदारांच्या निवासी पत्त्याचे पुरावे
- पगारदार नोकरांच्या बाबतीत, मागील 3 महिन्यांच्या वेतनचिठ्ठ्या आणि मागील 6 महिन्यांचे बँक विवरणपत्र, मागील 3 वर्षांचे प्राप्तिकर परतावे व फॉर्म 16 ए
- व्यवसायमालकांच्या बाबतीत, मागील 2 वर्षांची आर्थिक विवरणपत्रे व प्राप्तिकर परतावे आणि व्यवसायाच्या खात्याकरता मागील 1 वर्षाचे बँक विवरण पत्र.
- मालमत्तेचा मालकीहक्क करार (टायटल डीड)
मुख्य तारण :
- गृहकर्ज अंतिम तारखेपूर्वी परत केल्यास कुठलेही मुदतपूर्व भरणा शुल्क नाही. यामध्ये, आमचे गृहकर्ज अन्य बँका/वित्तीय संस्थांकडे वळवण्याचादेखील समावेश आहे.
- 20 वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारतीतील सदनिकेची खरेदी:- इमारतीचे सद्य वय काहीही असो, जर तिचे वास्तुरचना अभियंत्याने प्रमाणित केलेले उर्वरित आयुष्य 20 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि ती सुस्थितीत असल्याचे शाखेतील अधिकारी प्रमाणित करत असेल, तर अशा इमारतीमधील सदनिकेच्या खरेदीकरता कर्ज देण्याकरता विचार होऊ शकतो.
- बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील सदनिकेची खरेदी:- बांधकाम सुरू असलेल्या व जिचे 50% पेक्षा कमी बांधकाम पूर्ण झालेले असेल, अशा इमारतीमधील सदनिकेच्या खरेदीकरता, कर्जदाराच्या मालकाने हप्त्याची रक्कम कर्जदाराच्या वेतनातून कापण्यास मंजुरी दिल्यास, आणि/किंवा कर्जदाराने अतिरिक्त/आनुषंगिक तारण देऊ केल्यास, कर्ज देण्याचा विचार होऊ शकतो.
- गृहकर्जाची गहाणक्षमता तपासण्याकरता प्रक्रिया शुल्क प्रति सदनिका/मालमत्ता रू. 5000/- आहे. सदर शुल्क प्रस्ताव नाकारला गेल्यास परत मिळणार नाही व कर्ज मंजूर झाल्यास ही रक्कम सेवा शुल्कामध्ये वळती करून घेण्यात येईल.
आनुषंगिक तारण : एलआयपी, एनएससी, एफडीआर इ., असल्यास.
सेवा शुल्क :
सर्व्हिस चार्ज मॅन्युअलनुसार.
कायदेशीर शुल्क व मुद्रांक शुल्क : लागू असल्याप्रमाणे.