उद्देश
टेम्पो, ट्रक, टँकर, बस, प्रवासी वाहन इ. (नवीन अथवा वापरलेले) यांची खरेदी.
कमाल रक्कम / पात्रता / मार्जिन
A. नवे वाहन
- कमाल रू. 100.00 लाख प्रति वाहन किंवा
- वाहनखरेदीच्या प्रस्तावावरील शोरूम किंमत, एकवेळ कर, विमा व नोंदणी शुल्क यांसहित किंमतीच्या 85% किंवा
- कर्ज पात्रता= वार्षिक निव्वळ नफा, अंदाजित उत्पन्न, डीएससीआर इ. च्या आधारे परतफेड क्षमता ठरवल्यानंतर कर्जाची रक्कम निश्चित केली जाईल.
1, 2 व 3 यांपैकी जी रक्कम कमी असेल ती.
B. वापरलेले वाहन (द्वितीय हस्त)
- 3 वर्षांपेक्षा अधिक जुन्या नसलेल्या टेम्पो, ट्रक, टँकर करता आणि 4 वर्षांपेक्षा अधिक जुन्या नसलेल्या बसकरता, कमाल रू. 30.00 लाख किंवा
- वाहन अभियंत्याने केलेले मूल्यांकन/खरेदीकराराचे मूल्य यांपैकी जी रक्कम कमी असेल तिच्या जास्तीत जास्त 50% रक्कम किंवा
- वार्षिक निव्वळ नफा, अंदाजित उत्पन्न, डीएससीआर इ. च्या आधारे परतफेड क्षमता ठरवल्यानंतर कर्जाची रक्कम निश्चित केली जाईल
1, 2 व 3 यांपैकी जी रक्कम कमी असेल ती.
कमाल रक्कम / पात्रता
C. सीएनजी/एलपीजीमध्ये रूपांतराकरता कर्ज:
टेम्पो / ट्रक / बस : कमाल रू. 1.40 लाख (वाहनाचे तारण)
(सीएनजी किट बसवण्याकरता आरटीओची परवानगी अर्जदाराने सादर करणे आवश्यक)
परतफेड
- नवे वाहन :84 महिन्यांपर्यंत
- वापरलेले वाहन
- बसकरता 48 महिन्यांपर्यंत
- अन्य वाहनांकरत 36 महिन्यांपर्यंत.
व्याजदर येथे क्लिक करा
मार्जिन
नवे वाहन :15%
वापरलेले वाहन : खरेदीकरार/मूल्यांकनाच्या रकमेच्या 50%
सदस्यत्व
अर्जदार - नियमित सदस्यत्व.
हमीदार --
रू. 25.00 लाखपर्यंतच्या कर्जासाठी - नाममात्र सदस्यत्व, रू. 100/-.
रू. 25.00 लाखपेक्षा अधिक कर्जासाठी - नियमित सदस्यत्व रू. 1000/-
हमीदार
सुस्थितीतील दोन हमीदार, ज्यांच्यापैकी एक हमीदार कुटुंबीय असू शकतो.
तारण
वाहनाचे तारण
विमा
विमा पॉलिसीचे हक्क बँकेच्या नावे करणे आवश्यक.
सेवा शुल्क
मंजूर मर्यादेच्या 1.15% + लागू असल्याप्रमाणे जीएसटी
हिस्सा
मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम