कुठल्याही कारखाना/औद्योगिक/अभियांत्रिकी युनिट्स/स्थापत्य कंत्राटदार/शासकीय कंत्राटदार इ. ना वर्क ऑर्डरच्या नावे आम्ही फिरती पतमर्यादा (आरसीएल) पुरवतो. संबंधित पक्षाला त्याच्या कामाचे स्वरूप, काम पूर्ण करण्याची क्षमता, तसेच हातात/अपेक्षित असलेल्या वर्क ऑर्डर्स यांच्या आधारे एक विशिष्ट परमर्यादा मंजूर केली जाईल. |
ठळक मुद्दे :-
- वैयक्तिक कर्जाची रक्कम ऑर्डरचे मूल्य, नफा, कर्जदाराचे योगदान, असल्यास प्राप्त होणार असलेली अग्रीम रक्कम हे सर्व विचारात घेऊन ठरवण्यात येईल.
- पतमर्यादा कर्जदाराला मंजूर करण्यात येईल. कागदपत्रे आरसीएलच्या एकूण मर्यादेकरता तयार करण्यात येतील.
- आरसीएलखालील प्रत्येक उचलीकरता स्वतंत्र कागदपत्रांची आवश्यकता नाही.
- कर्जदाराच्या लेटरहेडवरील अर्जासोबत ऑर्डर वा कंत्राट/कराराच्या प्रती बँकेला सादर करणे आवश्यक आहे.
- व्याजदर कर्जदाराच्या सीसी खात्याला लागू असलेल्या दराप्रमाणे.
- कर्जदाराला जेव्हा केव्हा कंत्राट वा ऑर्डर प्राप्त होईल, तेव्हा तेव्हा तो आरसीएलखाली कर्ज वितरीत करण्याकरता बँकेशी संपर्क साधेल.
- मार्जिन ऑर्डर्सच्या 25% असेल.
- ऑर्डर सामान्यतः ज्या कालावधीमध्ये पूर्ण होणे अपेक्षित असेल, तो कालावधी 36 महिन्यांपेक्षा अधिक नसावा.
- आनुषंगिक तारण बँकेच्या विहित नियमांप्रमाणे आवश्यक.
सेवा शुल्क आणि हिश्श्याची रक्कम, लागू असल्याप्रमाणे. |
पहिल्या वर्षाच्या गुंतवणुकीवरील परताव्यकरता येथे क्लिक करा, |
अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net ,या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल. |