आमच्या ग्राहकांनी नामांकित खरेदीदारांच्या नावे जारी केलेली देयके आम्ही डिस्काऊंट करतो आणि विक्रीच्या तारखेपासून देयकाची रक्कम मिळेपर्यंतच्या तारखेपर्यंतच्या त्यांच्या अल्पकालीन गरजा भागवण्याकरता त्यांना तात्काळ निधी देतो.
|
ठळक मुद्दे / आवश्यक कागदपत्रे:-
- देयक खरोखरच्या व्यापारी व्यवहारापोटी निर्माण करण्यात आलेले असावे व ते प्राप्तकर्त्याने रीतसर मान्य केलेले असावे.
- माल पाठवला गेला आहे आणि प्राप्त झालेला आहे याच्या पुराव्यासाठी पोचपावतीयुक्त चलन/अबकारी कर गेट पास, दोन प्रतींमध्ये.
- देयक आणि खरेदी आदेशाच्या प्रती.
- लॉरी पावती/रेल्वे पावती इ. मालाच्या मालकीशी संबंधित कागदपत्रे.
- देयकाचे पैसे मिळण्यात विलंब झाल्यास, व्यवहाराच्या अटींनुसार कर्जदार अथवा त्याचे ग्राहक बँकेला एक पूर्वनिश्चित व्याज देतील.
- बँकेच्या विहित अटींप्रमाणे आनुषंगिक (कोलॅटरल) तारण आवश्यक.
- लागू असेल त्याप्रमाणे सेवा शुल्क.
|
व्याजदरांच्या माहितीकरता येथे क्लिक करा
|
अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net ,या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल. |