बँक हमी (गॅरंटी)
एखाद्या व्यापारी करारांतर्गत बंधनाला बळकटी आणण्याकरता आणि/किंवा सुरक्षित करण्याकरता आम्ही बँक हमी (बीजी) पुरवतो.
बँक हमी वा गॅरंटी याचा अर्थ बीजी दस्तैवजामध्ये निर्धारित केलेली रक्कम लाभार्थ्याला देय तारखेला किंवा तत्पूर्वी देण्याची बँकेने लेखी दिलेली हमी.
उद्देश, तारण आणि बांधीलकीनुसार
देऊ केले जात असलेले बँक हमीचे प्रकार -
(a). आर्थिक हमी:- आर्थिक हमी म्हणजे ग्राहकाने स्वीकारलेली आर्थिक बांधीलकी निर्धारित वेळेच्या आत पूर्ण करण्याची हमी.
(b). कामगिरीची हमी:- कामगिरीची हमी म्हणजे एखादे काम पूर्ण करणे, यंत्रसामग्री पुरवणे इ. सारखी विशिष्ट कृती विहित तारखेच्या आत अथवा दिलेल्या तपशीलांनुसार इ. पूर्ण करण्याची हमी.
(c). तारणाधारित हमी:- तारणाधारित हमी म्हणजे बँकेने रोख मार्जिनसह कुठल्यातरी मालमतेच्या तारणासमोर दिलेली हमी. सदर मालमत्तेचे बाजारमूल्य कुठल्याही वेळी हमीनुसार संभाव्यतः द्याव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा कमी नसणे आवश्यक असते.
(d). तारणविरहीत हमी:- तारणविरहीत हमी म्हणजे संभाव्य आर्थिक उत्तरदायित्वाच्या बाजारमूल्याइतके तारण न घेता बँक देत असलेली हमी. हमीकरता जर अंशतः तारण देण्यात आले असेल, तर बँक आरबीआयचे प्रचलित मार्गदर्शन विचारात घेऊन, विविध प्रकारच्या ग्राहकांनुसार घ्यावयाच्या तारणाचे योग्य ते प्रमाण निश्चित करेल व त्यामध्ये रोख मार्जिन व अन्य आनुषंगिक तारणे निर्धारित केलेली असतील.
(e). प्रलंबित पेमेंट हमी:- प्रलंबित पेमेंट हमी म्हणजे भांडवली मालमत्ता खरेदी करण्याकरता कर्जदारांना दिलेली हमी. प्रलंबित पेमेंट हमीच्या बाबतीत, भांडवली मालमत्ता खरेदी करण्याकरताच्या मुदतकर्जाच्या प्रस्तावांचे ज्याप्रमाणे मूल्यमापन केले जाते, त्याचप्रमाणे सदर प्रस्तावदेखील तपासले जातील.
(f). बिड बॉण्ड हमी:- बिड बॉण्ड हमी म्हणजे निविदेतील अटी व शर्तींनुसार वर्क ऑर्डर मंजूर करण्याकरता दिलेली हमी.
(g). अग्रीम रक्कम हमी:- सदर हमी लाभार्थ्याने जारी केलेल्या वर्क ऑर्डरसमोर निधी वितरीत करण्यासाठी दिली जाते. यामुळे ग्राहकांना बीजीच्या समोर मोबिलायझेशनसाठी अग्रीम रक्कम प्राप्त करण्यात मदत होते.
ठळक मुद्दे :-
- रोख मार्जिनसमोर पूर्णपणे तारणाधिष्ठित बीजी व्यतिरिक्त सर्व बीजींचे अर्जदार बँकेचे नियमित सदस्य असणे आवश्यक आहे.
- रोख मार्जिनसमोर पूर्णपणे तारणाधिष्ठित बीजीच्या बाबतीत अर्जदारांना नाममात्र सदस्य म्हणून स्वीकृत केले जाईल.
- अर्जदाराचे आमच्या बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे, त्याचे केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे आणि त्याने किमान 3 महिने त्याचे खाते समाधानकारकरित्या चालवलेले असणे आवश्यक आहे.
- पात्र ग्राहकांच्या वतीने खालील संस्थांना हमी जारी केली जाईल :
- शासन
- सार्वजनिक क्षेत्र उपक्रम/महामंडळे
- निमशासकीय मंडळे
- कायदेशीर मंडळे
- नामांकित व्यापारी संस्था, जसे प्रतिष्ठित प्रायव्हेट लि./लि. कंपन्या
- नोंदणीकृत गृहरचना संस्था
- बँकेच्या विहित अटींनुसार आनुषंगिक तारण
व्याजदरांच्या माहितीकरता येथे क्लिक करा
अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.