राष्ट्रीयीकृत आणि नामांकित खाजगी बँकांनी किंवा नामांकित सहकारी बँकांनी जारी केलेल्या पक्क्या पतपत्राखाली (लेटर ऑफ क्रेडिट) जारी केलेली देयके आम्ही डिस्काऊंट करतो.
देयके काटेकोरपणे एलसीच्या शर्तींनुसार जारी केलेली आणि वैध व्यापारी व्यवहारापोटी निर्माण झालेली असणे आवश्यक आहे.
|
सादर करावयाची कागदपत्रे
- देयक
- एलसीखाली तयार करण्यात आलेल्या व डिस्काऊंट करावयाच्या देयकांच्या बाबतीत, एलसीमध्ये नमूद करण्यात आलेली सर्व कागदपत्रे मूळ एलसीसह सादर करणे आवश्यक आहे.
- माल पोहोचल्याचा पुरावा म्हणून पोचपावतीयुक्त चलन/ मालाचा मालकीहक्क दर्शवणारी व माल पाठवण्यात आल्याचा पुरावा असलेली (एलआर/आरआर/शिपिंग) कागदपत्रे.
- पुढील काळात बँकेला आवश्यक वाटतील अशी अन्य कुठलीही कागदपत्रे.
- सेवा शुल्क, लागू असल्याप्रमाणे.
|
व्याजदरांच्या माहितीकरता येथे क्लिक करा
|
अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net ,या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल. |