ज्या व्यक्तींकडे कला/कुसर/व्यवसायातील कुठल्याही शाखेतील पदवी वा पदविका आहे अथवा ज्यांच्याकडे असे कौशल्य आहे जे बँकेच्या मते व्यवसाय ठरू शकेल, अशा व्यक्तींना अर्थसाहाय्य पुरवण्याचा विचार केला जाईल.
उदा.: वैद्यकीय व्यावसायिक, दंतवैद्य, अभियंते, वास्तुविशारद, सनदी लेखापाल, सर्वेक्षक, कारागीर, वकील, कायदेतज्ज्ञ, व्यवस्थापकीय सल्लागार इ.
- अर्जदाराकडे वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, अभियांत्रिकी इ. मधील मान्यताप्राप्त पदवी असणे आवश्यक आहे. किंवा मग अर्जदाराकडे बँकेच्या मतानुसार व्यवसाय ठरू शकणारे एखादे कौशल्य पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे.
- खालील गोष्टींकरता कर्जाचा विचार केला जाईल :
- साधने / उपकरणे खरेदी, जसे, वैद्यकीय व्यावसायिकाकरता एक्स-रे उपकरण; बांधकाम अभियंत्याकरता काँक्रीट मिक्सर; सनदी लेखापालाकरता संगणक इ.
- जागेचे नूतनीकरण, जसे, वैद्यकीय व्यावसायिकाकरता दवाखान्याचे बांधकाम / नूतनीकरण; सनदी लेखापालाकरता कार्यालयाचे बांधकाम / नूतनीकरण इ.
- खेळते भांडवलाची आवश्यकता, जसे कारागीराकरता कच्चा माल व इतर सामानाच्या वेळोवेळी खरेदीकरता इ.
- सेवाशुल्क, लागू असल्याप्रमाणे.
सेवा शुल्क आणि हिश्श्याची रक्कम, लागू असल्याप्रमाणे.
पहिल्या वर्षाच्या गुंतवणुकीवरील परताव्यकरता येथे क्लिक करा,
अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net ,या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.