अभ्युदय बँकेच्या कॅशलेस बँकिंगच्या आधुनिक जगात तुमचे स्वागत आहे! तुमचे आमच्यासोबतचे नाते दीर्घकालीन आणि समाधानकारक राहील अशी आम्ही आशा करतो.
रूपे चिप आधारित प्लॅटिनम डेबिट कार्ड:-
दैनंदिन पॉस/ई-कॉमर्स व्यवहारांकरता कमाल मर्यादा रू. 1,00,000/-; एटीएमद्वारे आहरणाच्या रू. 25,000/- या मर्यादेसह एकूण आहरण मर्यादा रू. 1,25,000/-.
आकर्षक वैशिष्ट्ये :
- वैयक्तिक अपघात विमासंरक्षण :रू. 2,00,000/- - अपघाती मृत्यू अथवा कायमस्वरुपी विकलांगता आल्यास.
- लाऊंजमध्ये प्रवेश :- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या लाऊंजमध्ये प्रवेश, म्हणजेच, विमानतळावर प्लॅटिनम कार्ड वापरून किमान रू. 2/- खर्च केल्यास कार्डधारक लाऊंजमध्ये प्रवेश करून अन्य संबंधित लाभही मिळवू शकतो.
- युटिलिटी देयकांवर कॅश बॅक :- प्लॅटिनम कार्ड वापरून युटिलिटी देयकांचा भरणा केल्यास 5% कॅश बॅक (कमाल रू. 50 प्रति कार्ड, दरमहा). युटिलिटी बिलांमध्ये दूरध्वनी, मोबाईल, वीज, गॅस, पाणी आणि स्वच्छता देयकांचा समावेश होतो.
- व्यापारी सवलती आणि लाभ:- रूपे प्लॅटिनम कार्डांचा वापर वाढवण्यामध्ये बँकांना साहाय्य करण्याकरता एनसीपीआय ने या कार्डांशी अनेक व्यापारी सवलती आणि लाभ जोडलेले आहेत. सध्या पुढीलप्रमाणे दोन योजना आहेत: i) क्रोमा ऑफर : किमान रू. 2,000 व त्यापुढील खरेदीवर सरसकट रू. 500 ची सूट आणि ii) अपोलो फार्मसी ऑफर: a) अपोलो एफएमसीजी -15% (300%_अपोलो उत्पादने, औषधे-10% सूट (डीपीसीओ औषधे वगळून), एफएमसीजी उत्पादने- 5% सूट.
सूचना: ऑफर्समध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात.
आपल्या शाखेशी संपर्क साधा आणि आपले कार्ड प्लॅटिनम रूपे डेबिट कार्डामध्ये बदलून घ्या
ईएमव्ही चिप बसवलेल्या अभ्युदय बँक रूपे डेबिट कार्डामुळे सुरक्षित व्यवहारांची खात्री होईल.
चिप आधारित रूपे डेबिट-कम-एटीएम कार्ड
रूपे ही एक भारतीय देशांतर्गत कार्ड योजना असून ती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी ही योजना तयार करून सुरू केलेली आहे. रूपे कार्डे सर्व एटीएम यंत्रे आणि पॉस टर्मिनल्सवर स्वीकारली जातात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रूपे क्लासिक कार्ड पोस्टरवर विमा संरक्षण सवलत येथे क्लिक करा
एनपीसीआयने जारी केलेल्या “एनपीसीआय / 2019-20 / रूपये / 003 दि. 23 मे, 2019” च्या परिपत्रकानुसार, रुपे क्लासिक कार्ड्ससाठी विमा कार्यक्रम वित्तीय वर्ष 2019-20 च्या पुढे वाढविण्यात येणार नाही,. एफ.वाय.2020-21 नंतर रूपे क्लासिक कार्डवर विमा सुविधा उपलब्ध होनार नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
डेबिट कार्डांशी संबंधित महत्त्वाच्या अटी व शर्ती
चिप आधारित रूपे डेबिट-कम-एटीएम कार्ड
महत्त्वाची सूचना: कृपया अभ्युदय बँक चिप आधारित रूपे डेबिट-कम-एटीएम कार्ड वापरण्यापूर्वी तुम्ही सदर अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचल्या असल्याची काळजी घ्या. सदर डेबिट-कम-एटीएम कार्ड वापरल्यास, येथे प्रस्तुत केलेल्या सर्व अटी व शर्ती तुम्ही बिनशर्त मान्य केल्याचे आणि तुम्ही त्यांनी बाध्य असाल, तसेच रिझर्व्ह बँकेच्या संबंधित नियमांचे, तसेच वेळोवेळी बदल/सुधारणा/लागू केल्या जाणाऱ्या, संबंधित कायद्यांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व नियमांचे तसेच वेळोवेळी लागू असलेल्या तदनुषंगिक कायद्यांचे अनुपालन करण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारत असल्याचे समजले जाईल. त्याचबरोबर, अभ्युदय सहकारी बँक लि. मधील बचत/चालू खात्यांच्या वापराशी संबंधित अटी व शर्तींशीदेखील तुम्ही बांधील राहाल.
परिभाषा
- “बँक“ म्हणजे अभ्युदय सहकारी बँक लि., बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणी केलेले एक कॉर्पोरेट मंडळ आणि तिचे उत्तराधिकारी व नामनियुक्त व्यक्ती.
- “कार्ड” किंवा “डेबिट कार्ड” ही संज्ञा अभ्युदय सहकारी बँक लि. ने कार्डधारकाला जारी केलेल्या अभ्युदय बँक चिप आधारित रूपे डेबिट-कम-एटीएम कार्डला संबोधित करणारी आहे.
- “कार्डहोल्डर” याचा अर्थ सदर अटी व शर्तींचे पालन करण्याची जबाबदारी स्वीकारून कार्डची मागणी करणारा मान्यताप्राप्त ग्राहक, ज्याला कार्ड जारी करण्यात आलेले आहे आणि जो कार्ड धारण करण्यास व वापरण्यास अधिकारप्राप्त आहे. कार्डधारकाला “तुम्ही”, “तुमचे”, “तो” किंवा अशा अर्थाच्या सर्वनामांनी संबोधलेले आहे आणि पुरुष कार्डधारकाचा संदर्भ असलेल्या सर्व सर्वनामांमध्ये स्त्री कार्डधारकही समाविष्ट आहेत.
- “अकाऊंट” याचा अर्थ कार्डधारकारकाचे बचत वा चालू खाते (खाती), जे बँकेने डेबिट कार्डच्या वापराकरता पात्र खाते म्हणून निर्देशित केलेले आहे. कार्डधारक एक तर स्वतः खातेधारक असावा किंवा एकापेक्षा अधिक खातेधारक/ स्वाक्षरी अधिकार प्राप्तकर्ते असल्यास एकमेव स्वाक्षरी अधिकार प्राप्तकर्ता असावा अथवा त्याला एकट्याला व्यवहार करण्याचे अधिकार प्राप्त असावेत. कायद्याने अज्ञान व्यक्तीचे खाते किंवा ज्यामध्ये अशी अज्ञान व्यक्ती सहखातेदार असेल असे खाते, किंवा एकमालक संस्था व रोख पत खातेधारकांव्यतिरिक्त अन्य संस्था अभ्युदय बँक चिप आधारित रूपे डेबिट कार्डधारक बनण्यास पात्र असणार नाहीत.
- “प्रायमरी अकाऊंट” याचा अर्थ, जर कार्डाशी एकापेक्षा अधिक खाती जोडलेली असतील, तर मुख्य वा पहिले (प्राथमिक) व्यवहार खाते म्हणून निर्देशित केलेले खाते. म्हणजेच, कार्डावरून खरेदी व्यवहार, रोख आहरण ज्या खात्यातून होतील, तसेच कार्डाशी संबंधित आकार व शुल्क ज्या खात्यामध्ये नावे पडतील असे खाते.
- “नॉमिनेटेड अकाऊंट्स” यामध्ये वर वर्णन केलेल्या प्राथमिक खात्याचा समावेश होतो आणि ही संज्ञा कार्डधारकाने त्याच्या/तिच्या डेबिट कार्ड व पिन क्रमांकाद्वारे वापरण्याचे लेखी निर्देश दिलेले खाते दर्शवते.
- “लिंक्ड अकाऊंट्स” याचा अर्थ अभ्युदय बँकेने वैध डेबिट कार्ड व्यवहारांकरता पात्र म्हणून निर्देशित केलेल्या प्राथमिक खात्याव्यतिरिक्तची कार्डधारकाची अन्य खाती. कार्डधारक एक तर स्वतः खातेधारक असावा किंवा एकापेक्षा अधिक खातेधारक/ स्वाक्षरी अधिकार प्राप्तकर्ते असल्यास एकमेव स्वाक्षरी अधिकार प्राप्तकर्ता असावा अथवा त्याला एकट्याला व्यवहार करण्याचे अधिकार प्राप्त असावेत.
- “एटीएम” याचा अर्थ ऑटोमेटेड टेलर मशीन, मग ते भारतभरामध्ये कुठेही बसवलेले असो आणि बँकेच्या स्वतःच्या मालकीचे असो अथवा एखाद्या विशिष्ट सामायिक नेटवर्कमधले असो, ज्यावर कार्डधारक त्याचे कार्ड वापरून इतर गोष्टींसमवेत बँकेमधील त्याच्या/तिच्या खात्यामध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा उपयोग करू शकतो.
- “कॅश डिस्पेन्सर” याचा अर्थ फक्त रोख रक्कम देण्याचे कार्य करण्यापुरते मर्यादित असलेले एटीएम मशीन.
- “पिन” याचा अर्थ पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर किंवा वैयक्तिक ओळख संकेतांक. हा क्रमांक एटीएम आणि इडीसी टर्मिनल वापरण्याकरता आवश्यक असतो आणि तो बँकेने कार्डधारकाला दिलेला वा वेळोवेळी त्याने/तिने स्वतः निवडलेला असू शकतो.
- “शेअर्ड नेटवर्क” याचा अर्थ जिथे रूपे कार्ड स्वीकारले जाते असे अभ्युदय सहकारी बँकेव्यतिरिक्त अन्य एटीएम्सचे जाळे.
- “ट्रॅन्झॅक्शन (व्यवहार)” याचा अर्थ कार्डधारकाने आपले कार्ड वापरून बँकेला आपल्या खात्यावर करण्याच्या क्रियेसंबंधी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे दिलेली कुठलीही सूचना.
- “अकाऊंट स्टेटमेंट” याचा अर्थ बँक कार्डधारकाला प्रत्येक ठराविक कालावधीनंतर पाठवते असलेले खाते विवरणपत्र किंवा जिथे खाते आहे त्या शाखेने जारी केलेले पासबुक, ज्यात कार्डधारकाने दिलेल्या कालावधीमध्ये केलेल्या सर्व व्यवहारांचे तपशील असतात आणि संबंधित तारखेला खात्यामध्ये असलेली शिल्लक नमूद केलेली असते. यामध्ये बँकेला योग्य वाटेल अशी अन्य माहितीदेखील समाविष्ट असू शकते.
- “मर्चंट” किंवा “मर्चंट एस्टॅब्लिशमेंट” याचा अर्थ भारतामध्ये कुठेही अस्तित्त्वात असलेले असे ठिकाण, जिथे कार्ड स्वीकारले जाते आणि यामध्ये दुकाने, रेस्तराँ, विमानकंपन्या, रेल्वे, पेट्रोल पंप इ. चा समावेश होतो.
- “इलेक्ट्रॉनिक डेटा कॅप्चर (इडीसी) किंवा पॉस (पीओएस)” याचा अर्थ भारतभरातील कुठलेही इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल स्वाईप टर्मिनल, मग ते अभ्युदय बँक रूपे कार्डाचे असो वा नेटवर्कवरील कुठल्याही बँकेचे. या टर्मिनल्सवर सदस्य संस्थेमध्ये खरेदी व्यवहार केल्यास संबंधित खात्यामध्ये सदर रक्कम नावे टाकण्याची परवानगी असते.
- “व्हॅलिड चार्जेस” याचा अर्थ कार्डचा वापर करून वस्तू वा सेवा विकत घेण्याकरता कार्डधारकाला द्यावा लागणारा आकार किंवा सदर उत्पादनाकरता बँकेने वेळोवेळी निश्चित केलेले कुठलेही अन्य आकार.
- “फोर्स मेजर इव्हेंट” याचा अर्थ आग, भूकंप, पूर, रोगाची साथ, संप, टाळेबंदी, कामगार विवाद, औद्योगिक पेचप्रसंग, दंगे, नागरी चळवळ, युद्ध, नागरी असंतोष, नैसर्गिक आपत्ती, दैवी घटना, एखाद्या वाहतूक संस्था वा अन्य सुविधांचे अपयश अथवा विलंब, चूकभूल आणि कायद्यातील बदलांसह, कर्तव्य पार पाडण्यास विरोध वा विलंब करणाऱ्या सार्वजनिक अधिकरणांच्या वा अन्य नियामक अधिकरणांच्या कृती अथवा बँकेच्या नियंत्रणाबाहेरील घटना व कृती किंवा ज्यांबद्दल पूर्वानुमान लावणे वाजवीरित्या शक्य नसते वा ज्यांसंबंधी वेळेआधी तरतूद करणे शक्य नसते आणि सामान्य सूज्ञपणा असलेली व्यक्ती ज्याचे भाकित करू शकत नाही अशा कुठल्याही घटना.
- “लॉ” यामध्ये, कुठल्याही शासन, वैधानिक अधिकरण, लवाद, मंडळ, न्यायालय अथवा मान्यताप्राप्त शेअरबाजार यांनी जारी केलेले सर्व कायदे, नियम, अध्यादेश, निवाडे, अधिसूचना, मार्गदर्शक सूचना, धोरणे, मार्गदर्शने, परिपत्रके, आदेश, तसेच अंतिम व अंतरिम आदेश व निर्णय यांचा समावेश होतो.
- “तांत्रिक समस्या” यामध्ये, वीजपुरवठा खंडित होणे, सॉफ्टवेअर वा हार्डवेअरमधील दोष, संगणक नादुरुस्त होणे, इंटरनेट उपलब्ध नसणे, बँकेचा सर्व्हर आणि एटीएम नेटवर्क यांच्यामधील संपर्कातील अडचणी, बँकेचे सर्व्हर बंद पडणे, जोड उपलब्ध नसणे, सॉफ्टवेअर करप्ट होणे, एटीएममध्ये किंवा अन्य कुठल्याही सेवा पुरवठादारांच्या पायाभूत सुविधा आणि दूरसंचार यंत्रणांमध्ये दोष निर्माण होणे, इतर दूरसंचार यंत्रणांमध्ये अडचणी येणे किंवा तंत्रज्ञानाशी निगडीत कुठलीही समस्या, यांचा समावेश होतो.
- “ॲड ऑन कार्ड” याचा अर्थ खातेदाराने निर्देशित केलेल्या व्यक्तीला जारी करण्यात आलेले एक पूरक अथवा अतिरिक्त कार्ड.
- “रूपे नियमावली” याचा अर्थ रूपे ने त्यांच्या फ्रँचायजी/सदस्य बँकांना जारी केलेली नियमावली.
पात्रता:
धनादेश पुस्तिकेची सुविधा असलेली बचत खाती/एकट्या व्यक्तीच्या नावे असलेली चालू खाती कार्ड जारी करण्यास पात्र आहेत. संयुक्त खात्यांच्या बाबतीत फक्त एकट्या व्यक्तीद्वारे चालवण्याची परवानगी असलेली खातीच कार्ड जारी करण्यास पात्र आहेत. संयुक्त स्वाक्षरीने चालवली जाणारी किंवा अज्ञान व्यक्तीची किंवा ज्यात अज्ञान व्यक्ती सहखातेदार आहे, अशी खाती पात्र ठरणार नाहीत.
वैधता:
सदर कार्ड बँकेचे एटीएम अथवा रूपेद्वारे मान्यताप्राप्त आणि त्यांचे बोधचिन्ह असलेल्या एटीएम्स वर वापरणे वैध आहे. हे कार्ड रूपेचे बोधचिन्ह असलेल्या भारतभरातील कुठल्याही पॉस टर्मिनल्सवरदेखील वापरता येते. मात्र, हे कार्ड कुठल्याही परकीय चलनाकरता वैध नाही. कार्डावर दिलेल्या महिना व वर्षाच्या शेवटच्या कामकाजी दिवसापर्यंत कार्ड वैध असते.
शुल्क आणि आकार
रूपे डेबिट कार्डाकरता खालील शुल्क आणि आकार लागू आहेत:
अ. क्र. |
क्रिया |
आकार * |
1. |
प्राथमिक कार्ड जारी करणे |
काही नाही |
2. |
पहिल्या वर्षी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
त्यानंतर वार्षिक शुल्क लागू |
रू.100/-(क्लासिक कार्ड)
रू.150/-(प्लॅटिनम कार्ड) |
3. |
अतिरिक्त/ॲड ऑन कार्ड जारी करणे |
रू.100/-(क्लासिक कार्ड)
रू.150/-(प्लॅटिनम कार्ड) |
4. |
गहाळ वा खराब झालेले कार्ड पुन्हा जारी करणे |
रू.100/-(क्लासिक कार्ड)
रू.150/-(प्लॅटिनम कार्ड) |
5. |
डुप्लिकेट पिन तयार करणे |
रू. 50/- |
6. |
अभ्युदय बँकेच्या एटीएमवर रोख आहरण/शिलकीची विचारणा – सर्व खातेदारांकरता |
काही नाही |
7. |
बचत खातेदारांकरता अन्य बँकांच्या एटीएमवरील एका कॅलेंडर महिन्यातील पाच व्यवहार (आर्थिक + बिगर आर्थिक #) |
काही नाही |
8. |
बचत खातेदारांकरता अन्य बँकांच्या एटीएमवरील एका कॅलेंडर महिन्यातील सहावा व्यवहार (आर्थिक + बिगर आर्थिक #) |
रू. 20/- प्रति व्यवहार |
9. |
पॉस टर्मिनलवरील व्यवहारांकरता आकार |
काही नाही |
10. |
पेट्रोल पंप व रेल्वे आरक्षण व्यवहारांकरता आकार |
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार |
11. |
चालू खातेदारांकरता अन्य बँकांच्या एटीएमवरील एका कॅलेंडर महिन्यातील सर्व व्यवहार (आर्थिक + बिगर आर्थिक #) |
रू.20/- प्रति व्यवहार |
* वरील आकारांमध्ये सेवा कर समाविष्ट नाही आणि त्यांमध्ये वेळोवेळी सुधारणा होऊ शकते.
# आर्थिक व्यवहारांमध्ये एटीएमवरील आहरणाचा समावेश होतो; बिगर आर्थिक व्यवहारांमध्ये शिलकीची विचारणा, पिनमधसूचना: शुल्क आणि आकार बँक वेळोवेळी निर्धारित करेल.
सूचना: शुल्क आणि आकार बँक वेळोवेळी निर्धारित करेल.
वैयक्तिक ओळख संकेतांक (पिन)
कार्डधारकांना कार्ड वापरण्याकरता सुरूवातीला बँकेद्वारे एक वैयक्तिक ओळख संकेतांक (पिन) जारी करण्यात येईल. सदर पिन आपल्याला एका सीलबंद पाकिटातून प्राप्त झाल्याची कार्डधारकाने खात्री करून घेणे आवश्यक आहे. पिन प्राप्त होताच कार्डधारकाने बँकेच्या एटीएमवर जाऊन तो बदलणे व आपल्या पसंतीचा दुसरा पिन निवडणे आवश्यक आहे. भविष्यात पिन क्रमांक पुन्हा बदलेपर्यंत प्रत्येक व्यवहाराकरता हा दुसरा पिन क्रमांक वापरणे आवश्यक आहे. कार्डधारकाने कुठल्याही परिस्थितीत आपला पिन आपला सहखातेदार व बँकेसहित अन्य कुणालाही उघड करता कामा नये. पिन उघड झाल्यामुळे होणाऱ्या परिणामांना कार्डधारक एकमेवरित्या जबाबदार राहील. यात कार्डचा अनधिकृत वापर होणेदेखील समाविष्ट असेल. कार्ड व पिन वापरून देण्यात आलेली कुठलीही सूचना, एकत्रितरित्या वा स्वतंत्रपणे दिलेली असली तरीही, ती कार्डधारकानेच दिली असल्याचे मानले जाईल आणि तसे मानण्याचा बँकेला अधिकार राहील.
- कार्ड गहाळ अथवा चोरीला गेल्यास ते हॉटलिस्ट करण्याकरता कार्डधारकाने त्यासंबंधी बँकेला तात्काळ सूचित करणे आवश्यक आहे. बँकेकडे नोंदणी केलेल्या आपल्या मोबाईलवरून “5667717” या क्रमांकावर “HOTC” असा एसएमएस पाठवून कार्डधारक आपले कार्ड हॉटलिस्ट करू शकतो. 24-तास सुरू असलेल्या ग्राहक सेवेद्वारे स्वतःच्या खर्चाने कार्ड गहाळ वा चोरीला जाण्याची घटना ग्राहक नोंदवू शकत असला, तरी शक्य तितक्या लवकर त्याने बँकेला लेखी तक्रार सादर करून त्यास दुजोरा देणे आवश्यक आहे. पोलिसांकडे तक्रार नोंदवल्याच्या पोचपावतीची एक प्रत सदर लेखी दुजोऱ्याला जोडणे आवश्यक आहे.
- गहाळ/चोरीची माहिती बँकेला लेखी स्वरुपात कळवल्यानंतर त्या वेळेपासून पुढे सदर कार्डावरून खरेदी करण्यात आल्याने उत्पन्न होणाऱ्या आर्थिक जबाबदारीपासून कार्डधारक सुरक्षित राहील. कृपया नोंद घ्यावी की, कार्ड ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू असताना एटीएमवरून रोख आहरण करण्यात आल्यास असे कुठलेही संरक्षण उपलब्ध असणार नाही, कारण असे व्यवहार पिनद्वारे संचालित असतात, जो क्रमांक फक्त कार्डधारकापुरताच गोपनीय असतो.
- कार्ड गहाळ झाल्याची माहिती बँकेला न दिल्यास आणि ती देण्यापूर्वी त्याचा गैरवापर झाल्यास त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या कुठल्याही दिवाणी वा फौजदारी जबाबदारी, नुकसान, खर्च इ. पासून बँकेस पूर्णपणे मुक्त ठेवण्यास कार्डधारक मान्यता देतो.
- तशी लेखी विनंती आणि आवश्यक ते शुल्क प्राप्त झाल्यानंतर बदली कार्ड जारी करण्याचा निर्णय सर्वस्वी बँकेच्या मर्जीनुसार घेण्यात येईल. त्याकरता कार्डधारकाने संबंधित अटी व शर्तींचे पूर्णतः अनुपालन करणे आवश्यक असेल.
- गहाळ झालेले/चोरीला गेलेले कार्ड नंतर सापडल्यास कार्डधारकाने त्याचा उपयोग करता कामा नये व सदर कार्ड त्यावरील चुंबकीय पट्टीवरून त्याचे अनेक तुकडे करून ते नष्ट करणे आवश्यक आहे.
कार्ड परत करणे / बदली कार्ड जारी करणे
वापरात असताना, गहाळ झालेले असताना वा अन्य प्रकारे कार्ड तुटले वा खराब झाले असल्यास बँकेने वेळोवेळी ठरवलेल्या किमतीला त्याचे बदली कार्ड जारी करण्यात येईल. मात्र सदर बदली कार्ड बँक सर्वस्वी बँकेच्या मर्जीनुसार जारी करेल व त्याकरता खालील अटी पूर्ण होणे आवश्यक राहील -
- नवा विनंतीअर्ज, आणि
- कार्ड तुटले/खराब झाले असल्यास, गहाळ झाले अथवा परत करण्यात आले असल्यास योग्य ती इन्डेम्निटी. बदली कार्ड जारी करण्याचा अर्थ नव्याने करार होणे असा होणार नाही.
कार्डधारकाला जारी केलेले कार्ड बँकेची मालमत्ता राहील व बँकेने विनंती केल्यास अथवा कार्डधारकाला कार्डची गरज उरली नसल्यास कार्ड बँकेला परत केले जाईल. कार्डधारकाला कार्डची सेवा नको असल्यास किंवा काही कारणाने बँकेने ही सेवा बंद केल्यास कार्डधारक त्याचे कार्ड रद्द करण्याकरता बँकेकडे परत देईल. गहाळ वा चोरी झालेल्या कार्डाकरता नव्या पिन क्रमांकासह बदली कार्ड देणे किंवा चालू कार्डाकरता नवीन पिन क्रमांक जारी करणे किंवा नव्या अथवा जुन्या पिन क्रमांकासह पुनर्नूतनीकृत कार्ड जारी करणे या गोष्टी बँक सर्वस्वी तिच्या मर्जीने व पूर्वीच्याच अटी आणि शर्तींवर किंवा बँकेला योग्य वाटणाऱ्या अन्य अटी व शर्तींवर करेल. वरील तरतुदींच्या अधीन, कार्डधारक त्याचे कार्ड एखाद्या त्रयस्थ पक्षाच्या हाती लागले किंवा त्याचा पिन क्रमांक त्रयस्थ पक्षाला ज्ञात झाल्यामुळे किंवा नकली कार्ड आणि/किंवा पिनद्वारे त्याच्या कार्डचा अयोग्य/फसवणूकयुक्त/अनधिकृत/सदोष वापर झाल्यास, बँकेला जबाबदार धरणार नाही.
कार्ड परत करण्याचा कार्डधारकाचा हक्क:
- कार्डधारक बँकेला किमान सात दिवसांची लेखी पूर्वसूचना देऊन आणि ताबडतोब कार्ड परत करून, तसेच अतिरिक्त कार्ड असल्यास ते त्यावरील चुंबकीय पट्टीतून कापण्याद्वारे त्याचे अनेक तुकडे करून, सदर सेवा बंद करू शकतो. कार्डावरील सर्व सुविधा आणि देय झालेल्या संबंधित आकारांचा खर्च देण्याची जबाबदारी कार्डधारकावर राहील. कार्डाचा वापर गैर/फसवणूकयुक्त असो वा नसो आणि कार्ड नष्ट झाल्याची सूचना बँकेला दिलेली असो वा नसो, डेबिट कार्डावर देय झालेले सर्व आकार भरण्याची जबाबदारी कार्डधारकावर राहील. सदर कार्डाची सुविधा कुठल्याही वेळी, कुठल्याही कारणामुळे अथवा कारण न देता बंद करण्याचा अधिकार बँकेला राहील.
- कार्डधारकाला त्याचे प्राथमिक खाते बंद करावयाचे असल्यास वा अन्यप्रकारे त्याने कार्ड सुविधेचा वापर बंद करण्याचे ठरवल्यास त्याने बँकेला किमान दोन कामकाजी दिवसांची लेखी पूर्वसूचना देणे आणि कार्ड जारी करणाऱ्या शाखेमध्ये त्वरित कार्ड परत करणे, तसेच त्याची एक वैध पोचपावती प्राप्त करणे आवश्यक राहील..
कार्डचे नूतनीकरण करण्यास वा ते बंद करण्यास नकार देण्याचा बँकेचा अधिकार:
- विहीत आकार स्वीकारून कार्डचे पुनर्नूतनीकरण करणे सर्वस्वी बँकेच्या मर्जीवर अवलंबून असेल. कुठल्याही कार्डधारकाला, कुठल्याही वेळी, कुठल्याही कारणामुळे अथवा कारण न देता, कार्ड जारी करण्यास वा त्याच्या कार्डचे नूतनीकरण करण्यास नकार देण्याचा किंवा त्याचे कार्ड आणि/किंवा तत्संबंधी सेवा रद्द करण्याचा अधिकार सर्वस्वी बँकेकडे राहील.
- कार्डधारकाने बँकेमधील त्याचे/तिचे खाते बंद करण्याचा निर्णय घेतल्यास सदर खात्याकरता जारी केलेली सर्व कार्डे आपोआप रद्द होतील. कार्डधारकाने सदर खात्याशी जोडलेल्या आपल्या कार्डचा, तसेच संबंधित अतिरिक्त कार्डे असल्यास त्यांचा वापर ताबडतोब थांबवून ते नष्ट करणे किंवा बँकेला परत करणे आवश्यक आहे. कार्डावरील एखाद्या व्यवहाराची रक्कम खात्यावर अद्याप नावे टाकण्यात आलेली नसल्यास सदर रक्कम खातेधारकाला बँकेकडून देय असलेल्या त्याच्या खात्यातील शिलकीमधून वळती करून घेण्यात येईल.
- खालील परिस्थितींमध्ये बँक कार्ड सुविधा तात्काळ रद्द करेल व कार्ड बँकेकडे परत येईल :
- येथे नमूद केलेल्या आणि कार्डधारकाच्या, बँकेतील खात्याला लागू असलेल्या अटी व शर्तींचे पालन वा अनुपालन करण्यात अपयश आल्यास;
- बँकेसोबत केलेल्या कुठल्याही करार वा वचननाम्याचा (आनुषंगिक वा अन्यथा) भंग झाल्यास;
- कार्डधारक दिवाळे वाजणे किंवा तत्सम कुठल्याही कारवाईचा विषय बनल्यास;
- कार्डधारकाचा मृत्यू ओढवल्यास;
- कार्डधारकाचे मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती मिळाल्यास;
- सदर सुविधेचा कुठल्याही प्रकारे गैरवापर/अयोग्य वापर होत असल्याचे बँकेला वाटल्यास;
- नेटवर्कमधील कुठल्याही बँक वा शाखेकडून विपरीत अहवाल मिळाल्यास; बँकेने प्राथमिक खाते वापरातून काढल्यास कार्डाचा वापर रद्द केला जाईल. एटीएम कार्ड सुविधा बंद करण्यात आलेली असो वा नसो, तत्पूर्वी प्रक्रिया झालेले पण कार्डधारकाच्या शाखेला कार्ड बंद केल्यानंतर कळवण्यात आलेले व्यवहार कार्डधारकाच्या खात्यातून पूर्ण केले जातील.
- कार्डधारकाचे खाते बंद झाल्यास अथवा त्याला सदर खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्यात अपयश आल्यास.
कार्ड सुरू करणे
तुमचे कार्ड वापरात आणण्याकरता कृपया अभ्युदय बँकेच्या अथवा एनएफएस नेटवर्करील एटीएमवर किंवा पॉसवर त्याचा वापर करा.
कार्डधारकाच्या जबाबदाऱ्या
- कार्ड जारी करणे व त्याचा वापर, अभ्युदय सहकारी बँक लि. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी जारी केल्याप्रमाणे लागू असलेल्या कायदे व नियमांच्या अधीन असतील.
- सदर कार्ड, बँकेने अभ्युदय बँकेच्या अथवा रूपे नेटवर्कचे सदस्य असलेल्या अन्य बँकांच्या एटीएम्सवर आणि मर्चंट एस्टॅब्लिशमेंट्समधील पॉस स्वाईप टर्मिनल्सवर, फक्त भारतातील व्यवहारांकरता वैध आहे.
- कार्डधारकाला त्याचे कार्ड कुठल्याही परिस्थितीत अन्य कुणाला हस्तांतरित करता येणार नाही वा वापराचे हक्क प्रदान करता येणार नाहीत.
- सदर कार्ड हे कायमस्वरुपी अभ्युदय सहकारी बँक लि. ची मालमत्ता आहे व राहील आणि बँकेने तशी लेखी विनंती केल्यास ते बँकेकडे ताबडतोब व विनाअट परत करणे आवश्यक राहील. कार्डधारकांना विनंती आहे की, त्यांनी आपले कार्ड परत करताना बँकेच्या संबंधित अधिकाऱ्याची ओळख पटवण्याची खात्री करून घ्यावी.
- कार्ड प्राप्त होताच कार्डधारकाने त्यावर तात्काळ स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अन्य कुणाला कार्डाचा वापर करण्याची परवानगी देऊ नये आणि आपले कार्ड सदैव स्वतःजवळ बाळगण्याद्वारे कार्डाचा गैरवापर होण्यापासून त्याचे संरक्षण करावे.
- कार्डासोबत कार्डधारकाला जारी करण्यात आलेला पिन क्रमांक किंवा कार्डधारकाने निवडलेला अन्य कुठलाही पिन क्रमांक फक्त कार्डधारकालाच ज्ञात असणे आणि त्याने तो खाजगीरित्या वापरणे आवश्यक आहे. आपला पिन क्रमांक अत्यंत गोपनीय असून तो अन्य कुणालाही हस्तांतरित करता येणार नाही. पिन क्रमांक कुठल्याही त्रयस्थ पक्षाला वापरता येईल अशा पद्धतीने, ठिकाणी व स्वरुपात लिहून ठेवता कामा नये. पिन क्रमांक कुठल्याही परिस्थितीत आणि स्वेच्छेने अथवा अन्य प्रकारे, कुठल्याही स्वरुपात, कुठल्याही त्रयस्थ पक्षाला, बँकेच्या कर्मचाऱ्याला अथवा मर्चंट एस्टॅब्लिशमेंटला उघड करता कामा नये.
- कार्डचा वापर करून केलेल्या रोख आहरण, हस्तांतरण, अन्य व्यवहार, तसेच देय झालेले आकार यांची रक्कम कार्डधारकाच्या खात्यावर त्वरित नावे टाकण्यात येईल. असे व्यवहार पूर्ण करण्याकरता कार्डधारकाने आपल्या खात्यामध्ये पुरेशी शिल्लक सांभाळणे आवश्यक आहे.
- कार्डधारक आपल्या खात्यामध्ये, बँकेने वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे किमान शिल्लक ठेवेल व तसे न केल्यास बँक तिच्या मर्जीनुसार, बँकेच्या वेळोवेळीच्या नियमांनुसार दंडात्मक अथवा सेवा शुल्क आकारेल आणि/किंवा कार्ड सुविधा रद्द करेल. त्याकरता कार्डधारकाला कुठलीही पूर्वसूचना देण्यात येणार नाही आणि/किंवा सुविधा रद्द करण्यामुळे उत्पन्न होणारी कुठलीही आर्थिक जबाबदारी बँक स्वीकारणार नाही.
- कार्डधारकाने खात्यामध्ये पुरेसा निधी असल्याशिवाय कार्डचा वापर वा वापराचा प्रयत्न करता कामा नये. कुठल्याही कारणास्तव कार्डधारकाच्या कार्डखात्यामध्ये असलेल्या शिलकीपेक्षा अधिक रक्कम कार्डावर नावे पडल्यास कार्डधारक अशा अतिरिक्त रकमेवर द. सा. 18% किंवा वेळोवेळी लागू असलेल्या दराप्रमाणे व्याज व बँकेने आकारलेले शुल्क 3 दिवसांच्या आत भरण्याची जबाबदारी स्वीकारतो.
- कार्डधारकाच्या प्राथमिक अथवा दुय्यम खात्यांमध्ये किंवा एकट्याच्या वा संयुक्त नावाने असलेल्या अन्य कुठल्याही खात्यांमध्ये असलेल्या विद्यमान अथवा भावी शिलकीवर, अन्य कुठलाही कायदेशीर अधिकार वा भार असो वा नसो, स्वतःचा कायदेशीर अधिकार व वसुलीचा हक्क राखून ठेवते. सदर हक्क कार्डधारकाला पुरवलेल्या आणि/किंवा त्याने वापरलेल्या सेवेद्वारे देय असलेल्या सर्व थकबाकीच्या रकमेपुरता असेल.
- कार्डधारकाने मान्यता दिलेले असोत वा नसोत, पण कार्ड वापरून करण्यात आलेल्या व्यवहारांकरता तोच जबाबदार राहील आणि कार्ड वा पिन क्रमांकाचा अनधिकृत उपयोग झाल्यामुळे काही नुकसान वा हानी झाल्यास बँकेला त्याविषयीच्या जबाबदारीपासून मुक्त ठेवेल. यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचा अथवा प्रचलित असलेल्या कुठल्याही कायद्याचा भंग झाल्यामुळे उद्भवू शकणाऱ्या दंडात्मक कारवाईचादेखील समावेश असेल. प्रस्तुत करार रद्द झालेला असो वा नसो, त्यामुळे वरील गोष्टीत फरक पडणार नाही.
- जिथे एका सहखातेदाराला एकच कार्ड जारी करण्यात आले असेल अशा संयुक्त खात्याच्या बाबतीत, अन्य सहखातेदारांनी सदर कार्ड जारी करण्यासाठीच्या अर्जावर स्पष्टपणे त्याकरता त्यांची मान्यता आणि स्वीकृती देणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक व्यक्तींनी सदर अटी व शर्ती स्वाक्षरी करून मान्य केल्यास प्रस्तुत करारातील कर्तव्ये व बाध्यता संदर्भानुसार त्या सर्व व्यक्तींना स्वतंत्रपणे आणि एकत्रितरित्या लागू होतील. अशा कुठल्याही एका व्यक्तीला कुठलीही सूचना देण्यात आल्यास, ती सर्वच अशा व्यक्तींपर्यंत पोहोचल्याचे गृहित धरले जाईल:-
- “कुणीही एक किंवा हयात व्यक्ती” अशा कार्यचालनविषयक सूचना असलेल्या संयुक्त खात्यांच्या बाबतीत, प्रत्येक सहखातेदाराला स्वतंत्र कार्ड घेण्याचा हक्क असेल, मात्र त्याकरता सर्व सहखातेदारांनी तशी विनंती करणे आवश्यक असेल.
- सहखातेदारांपैकी कुणाही एका व्यक्तीने “स्टॉप ऑपरेशन” सूचना दिल्यास, अशा कार्ड खात्यावर कार्डाद्वारे कुठलीही क्रिया करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कुठल्याही एका वा अधिक सहखातेदारांना फक्त ते सहखातेदार असलेल्या कार्ड खात्यांकरताच “स्टॉप ऑपरेशन” सूचना, देता येईल.
- “स्टॉप पेमेंट” सूचना रद्द करण्याची सूचना सर्व सहखातेदार एकत्रितरित्या बँकेला देतील. अशा परिस्थितीत असे कार्ड पुन्हा सुरू करण्याकरता सर्व सहखातेदारांनी एकत्रितरित्या नव्याने मंजुरी/अधिकार देणे आवश्यक राहील.
- कार्डधारकांना विनंती आहे की, कार्ड त्यावर दर्शवलेल्या महिना/वर्षाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत वैध असते. बँक तिच्या मर्जीनुसार नूतनीकृत कार्ड जुन्या कार्डाची वैधता संपण्यापूर्वी पाठवेल व त्याकरता खात्याच्या संचालनाचे मूल्यमापन केले जाईल. तुमच्या कार्डाचे नूतनीकरण करण्याचा हक्क एकमेवरित्या बँक राखून ठेवते. मुदत संपलेले डेबिट कार्ड त्यावरील चुंबकीय पट्टीमधून त्याचे अनेक तुकडे करून नष्ट करण्याची जबाबदारी कार्डधारकावर राहील.
- कार्डधारकाने आपल्या कार्डाचे पासबुक/खाते विवरणपत्र आपले खाते असलेल्या शाखेमधून महिन्यातून किमान एकदा प्राप्त करणे आवश्यक आहे.
- बँकेकडे शारीर रूपात अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विवरणपत्रामध्ये एटीएम अथवा मर्चंट एस्टॅब्लिशमेंटमधील व्यवहारांच्या तपशीलाबाबत काही अनियमितता वा चूक आढळल्यास विवरणपत्राच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत कार्डधारकाने सदर गोष्ट अभ्युदय बँकेला लेखी कळवणे आवश्यक आहे. शक्य तिथे आणि तेव्हा बँक कार्डधारकांना त्यांच्या व्यवहारांचे तपशील एसएमएसद्वारे त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवण्याचा प्रयत्न करेल. वरील कालावधीमध्ये अशी कुठलीही सूचना न मिळाल्यास व्यवहार आणि विवरणपत्र अचूक आहेत असे अभ्युदय बँक गृहित धरेल.
एकापेक्षा अधिक खाती / संयुक्त खाती
- कार्डधारकाची बँकेमध्ये एकापेक्षा अधिक खाती असल्यास त्यातल्या किती खात्यांवर कार्ड सुविधा द्यावी याचा निर्णय बँकेने घेण्यास कार्डधारकाची हरकत असणार नाही.
- एकापेक्षा अधिक खात्याशी जोडलेल्या कार्डांच्या बाबतीत, सामायिक (शेअर्ड) नेटवर्कवर आणि मर्चंट एस्टॅब्लिशमेंट्समध्ये केलेले व्यवहार प्राथमिक खात्यामधून केले जातील. या खात्यामध्ये आवश्यक निधी नसला आणि त्याच कार्डाशी जोडलेल्या अन्य खात्यांमध्ये तो उपलब्ध असला तरी, बँक सदर व्यवहार पूर्ण करणार नाही.
- कार्डावर देय असलेली रक्कम भरल्याशिवाय आणि कार्ड बँकेला परत केल्याशिवाय प्राथमिक खात्याचे हस्तांतरण अथवा त्याच्या कार्यचालनामध्ये बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- कार्ड वापरून केलेल्या वस्तू वा सेवांची खरेदी, रोख आहरण, लागू असलेले शुल्क, आकार आणि देय रकमा यांकरता बँक कार्डाशी जोडलेल्या खात्यांमध्ये तेवढी रक्कम नावे टाकेल.
- कार्डाची मुदत संपेपर्यंत कार्डधारक बँकेमधील त्याच्या/तिच्या प्राथमिक खात्यामध्ये वेळोवेळी लागू असेल त्याप्रमाणे किमान शिल्लक सांभाळेल व ठेवीची रक्कम सदर किमान रकमेपेक्षा कमी झाल्यास वा झालेली असल्यास बँक तिच्या मर्जीनुसार, बँकेच्या वेळोवेळीच्या नियमांनुसार दंडात्मक अथवा सेवा शुल्क आकारेल आणि/किंवा कार्ड सुविधा रद्द करेल. त्याकरता कार्डधारकाला कुठलीही पूर्वसूचना देण्यात येणार नाही आणि/किंवा सुविधा रद्द करण्यामुळे उत्पन्न होणारी कुठलीही आर्थिक जबाबदारी बँक स्वीकारणार नाही.
- कार्डधारक वा संयुक्त खातेदार असलेला व संयुक्त खाते एकट्याने वापरण्याचे अधिकार असलेला कार्डधारक, बँकेच्या अभिलेखातील नोंदीनुसार कार्डाचा वापर करून काढलेली रक्कम आणि/किंवा केलेल्या निधी हस्तांतरणाची रक्कम संबंधित खात्यावर नावे टाकण्याचे अधिकार बँकेला प्रदान करतो. एटीएम आणि पॉस यंत्रांवर प्रक्रिया झालेल्या व्यवहारांचे बँकेकडील अभिलेख सर्व खातेदारांवर स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणे बंधनकारक असतील. बँकेने वेळोवेळी निर्धारित केलेले कार्डाशी संबंधित सर्व शुल्क आणि आकार कार्डधारकाच्या कुठल्याही खात्यामधून वसूल केले जातील. कुठल्याही संयुक्त खात्याच्या सहखातेदाराला कार्डाचे कार्यचालन थांबवण्याकरता स्टॉप पेमेंट/ट्रॅन्झॅक्शन सूचना देण्याची इच्छा असल्यास बँकेला किमान सात दिवस आधी सुस्पष्ट व लेखी सूचना देणे आवश्यक आहे, जेणेकरून बँक नेटवर्कवरील सर्व सदस्य बँका/एटीएम केंद्रांना त्यासंबंधी कळवू शकेल व स्वतःच्या मर्जीनुसार सदर सूचनेचे पालन करण्यासाठी पावले उचलू शकेल.
चिप आधारित रूप डेबिट-कम-एटीएम कार्डाची वैशिष्ट्ये
- एटीएम सुविधा: कार्ड खात्याशी संबंधित खालील सुविधा अभ्युदय सहकारी बँकेच्या एटीएमवर उपलब्ध आहेत व त्या सर्वस्वी बँकेच्या मर्जीनुसार देऊ केल्या जातील, तसेच त्यांमध्ये वेळोवेळी कुठलीही पूर्वसूचना न देता बदल केला जाऊ शकेल.
- कार्डधारकाला त्याच्या/तिच्या कार्ड खात्यामधून प्रत्येक 24 तासांच्या अवधीमध्ये, बँकेने वेळोवेळी विहित केलेल्या निर्धारित संख्या व मर्यादेपर्यंतची रोख रक्कम काढता येईल.
- कार्ड खात्यामधील शिलकीची विचारणा
- खात्याच्या लघुविवरणपत्राची छापील प्रत मिळवणे
- पिन क्रमांक बदलणे
- अभ्युदय सहकारी बँकेच्या कॅश डिस्पेन्सरमध्ये आणि रूपे नेटवर्कच्या सदस्य असलेल्या अन्य बँकांच्या एटीएममध्ये खालील सुविधा देऊ केल्या जातील. यांमध्ये वेळोवेळी, कुठलीही पूर्वसूचना न देता बदल होऊ शकतील :-
- कार्डधारकाला त्याच्या/तिच्या कार्ड खात्यामधून प्रत्येक 24 तासांच्या अवधीमध्ये, बँकेने वेळोवेळी विहित केलेल्या निर्धारित संख्या व मर्यादेपर्यंतची रोख रक्कम काढता येईल.
- कार्ड खात्यामधील शिलकीची विचारणा
- पिन क्रमांक हा एक गोपनीय चार आकडी संकेतांक असतो ज्याला एटीएम पिन असे म्हटले जाते व तो बँकेद्वारे कार्डधारकाला दिला जातो. कार्डधारकाला कार्डाचा वापर करून एटीएम सेवांचा लाभ घेण्याकरता हा पिन क्रमांक एटीएमवर भरणे आवश्यक असते. बँकेने टपालाने पाठवलेला पिन क्रमांक कुठलीही छेडछाड न होता सीलबंद पाकिटात प्राप्त झाल्याची खात्री कार्डधारकाने करून घेणे आवश्यक आहे.
- बँकेच्या एटीएमवर संबंधित मेनू विकल्पाद्वारे दिलेला पिन क्रमांक बदलून घेण्याची शिफारस केली जाते. तसेच ठराविक कालावधीनंतर पिन क्रमांक बदलत राहण्याचीदेखील शिफारस केली जाते. कार्डधारक पिन क्रमांक विसरल्यास तो पुन्हा निर्माण करण्याकरता बँकेला विनंती करणे आवश्यक आहे. नवीन पिन क्रमांक बँक कार्डधारकाच्या बँकेकडे नोंदवलेल्या पत्त्यावर थेट पाठवेल. नवीन पिन क्रमांक सर्वस्वी बँकेच्या मर्जीनुसार जारी करण्यात येईल. त्याकरता औपचारिक विनंती करणे व आवश्यक ते शुल्क भरणे आवश्यक आहे.
डेबिट कार्डावर विविध वैशिष्ट्ये देऊ करण्याकरता बँक वेळोवेळी आपल्या मर्जीनुसार विविध संस्थांशी करार करू शकते. ही सर्व वैशिष्ट्ये सर्वोत्तम प्रयत्न तत्त्वावरच उपलब्ध असतील. विविध सेवा पुरवठादार, विक्रेते वा मध्यस्थ संस्था देऊ करत असलेल्या उत्पादनांच्या उपयुक्तता, कार्यक्षमता व परिणामकारकतेची हमी बँक देत नाही. त्यासंदर्भात काही विवाद उत्पन्न झाल्यास त्यामध्ये बँकेला न गुंतवता थेट संबंधित विक्रेत्यांशीच संपर्क साधणे आवश्यक आहे.
एटीएमचा वापर
सदर कार्ड अभ्युदय सहकारी बँक लि. च्या एटीएमवर आणि एनएफएस एटीएम नेटवर्कवर (रूपे) स्वीकारले जाते.
- कार्डधारकाने त्याच्या कार्डचा वापर (a) खात्यामध्ये पुरेसा निधी असल्याशिवाय रोख आहरण वा निधी हस्तांतरण (विहित मर्यादेच्या आत) करण्यासाठी करता कामा नये आणि/किंवा (b) अन्य पक्षांना त्याने/तिने जारी केलेले धनादेश न वटण्याच्या उद्देशाने रोख रक्कम काढून घेण्याकरता वा निधी हस्तांतरण करण्यासाठी करता कामा नये. एटीएम/ पॉस टर्मिनलच्या बाबतीत नावे आणि क्लियरींगचे धनादेश खात्यामध्ये एकाच वेळी सादर केले जातात. एटीएम वा पॉस टर्मिनलवरील नावे व्यवहारांना धनादेशांपेक्षा वरचे प्राधान्य देण्यात येईल आणि असे नावे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर खात्यामध्ये पुरेसा निधी नसल्यास बँक धनादेश परत पाठवेल. धनादेश आणि अन्य व्यवहारांकरता पुरेसा निधी खात्यामध्ये सांभाळण्याची जबाबदारी खातेधारकावर राहील.
- सदर कार्ड एका गोपनीय पिन क्रमांकासह एटीएमवर वापरता येते. पिनचा वापर करून केलेल्या सर्व व्यवहारांची जबाबदारी कार्डधारकावर राहील व तो अशा व्यवहारांच्या अभिलेखांना बांधील असेल. कार्डधारक जेव्हा एटीएमवर एखादा व्यवहार पूर्ण करतो, तेव्हा तो त्याची नोंद छापील स्वरुपात प्राप्त करण्याचा पर्याय निवडू शकतो. तो जेव्हा त्याचे कार्ड वापरतो, तेव्हा या एटीएम पावतीवर त्याच्या खात्यातील शिल्लक रक्कम दिसू शकते.
- सर्व व्यवहारांना, विशेषतः रोख आणि धनादेशांचा भरणा यांना, अंतरिम कालावधीमुळे विलंब होणे शक्य असते. अशा विलंबामुळे कार्डधारकाला कुठलेही नुकसान वा हानी किंवा त्रास सोसावे लागल्यास त्याची जबाबदारी बँक स्वीकारत नाही.
- कार्डधारकाने एटीएमवर छापलेली व्यवहाराची नोंद जतन करणे व त्यावर छापलेले तपशील तपासून पाहणे आवश्यक आहे.
- कार्डधारक हे मान्य करतो की, त्याला एका दिवसात कमाल रू. 25,000/- रोख आहरण आणि कमाल रू. 50,000/- ची खरेदी करण्याची परवानगी आहे (एकूण रू. 75,000/- प्रति दिवस). सदर परवानगी खात्यामध्ये स्वच्छ शिल्लक उपलब्ध असण्याच्या, तसेच बँकेने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कमाल आहरण/खरेदीच्या मर्यादांच्या अधीन असेल. सदर मर्यादांचा भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची/तिची कार्ड सुविधा बंद केली जाऊ शकते. कार्डधारक हे मान्य करतो की, खात्यामध्ये पुरेसा निधी असल्याशिवाय तो कार्डचा वापर करून आहरण/खरेदी करण्याचा प्रयत्न करणार नाही. खात्यामध्ये पुरेसा निधी ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे खातेधारकावर आहे.
कृपया नोंद घ्या : अभ्युदय बँकेच्या एटीएमव्यतिरिक्त अन्य एटीएमचा वापर करण्यावर संबंधित वापराच्या मार्गदर्शक सूचना आणि बँकेच्या अटी व शर्तींनुसार आकार लागू होतील.
मर्चंट एस्टॅब्लिशमेंटमधील (व्यापारी संस्थान) वापर
- सदर कार्ड भारतातील व्यापारी संस्थानांमधील, रूपे इलेक्ट्रॉन बोधचिन्ह लावलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक पॉस टर्मिनल्सवर स्वीकारले जाते.
- ज्या व्यापारी संस्थानांमध्ये इडीसी स्वाईप टर्मिनल्स बसवलेली आहेत तिथेच फक्त हे कार्ड स्वीकारले जाऊ शकते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीऐवजी अन्य कुठल्याही प्रकारे सदर कार्ड वापरल्यास ते अनधिकृत समजले जाईल आणि अशा व्यवहारांची जबाबदारी सर्वस्वी कार्डधारकावर राहील.
- कार्डधारक जेव्हा जेव्हा व्यापारी संस्थानामध्ये हे कार्ड वापरेल, तेव्हा प्रत्येकवेळी त्याने विक्रीच्या पावतीवर स्वाक्षरी करणे आणि त्याची एक प्रत जपून ठेवणे आवश्यक आहे. विक्री पावतीची प्रत बँक पुरवणार नाही. कार्डधारकाने स्वाक्षरी न केलेल्या, पण संबंधित व्यवहार त्याने/तिने मान्यता दिलेला आहे असे सिद्ध करता येणाऱ्या विक्री पावतीचे पैसे भरणे हे त्याचेच उत्तरदायित्व समजले जाईल.
- व्यापाऱ्याच्या कार्डधारकाशी होणाऱ्या कुठल्याही व्यवहाराची जबाबदारी बँक स्वीकारणार नाही. यात अशा प्रकारे देऊ करण्यात आलेल्या वा स्वीकारलेल्या वस्तू वा सेवांचा, पण तेवढ्यापुरतेच मर्यादित नसलेल्या सर्व गोष्टींचा समावेश होतो. कार्डधारकाला रूपे इलेक्ट्रॉनच्या कुठल्याही व्यापारी संस्थानाबद्दल तक्रार असल्यास त्याने सदर प्रकरण संबंधित व्यापारी संस्थानासोबत सोडवणे आवश्यक आहे आणि तसे न केल्यास त्याच्या बँकेप्रतीच्या कुठल्याही जबाबदारीतून तो मुक्त होऊ शकत नाही.
- व्यापारी संस्थानाने व्यवहाराच्या मूल्य/खर्चापेक्षा कुठलेही अतिरिक्त आकार लागू केल्या, त्याची जबाबदारी बँक स्वीकारणार नाही आणि व्यवहाराची रक्कम, तसेच हे आकार अशा दोन्ही रकमा कार्डधारकाच्या खात्यावर नावे टाकण्यात येतील.
- खरेदी व्यवहार आणि नंतर सदर वस्तू/सेवा परत करून व्यवहार रद्द केल्यामुळे मिळणारा परतावा हे दोन स्वतंत्र व्यवहार आहेत. असा परतावा व्यापारी संस्थानाकडून प्राप्त झाल्यानंतरच तो (कॅन्सलेशन आकार वजा करून) कार्डधारकाच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. नावे व्यवहारांच्या विपरीत, जमा व्यवहारांचा परिणाम ऑनलाईन दिला जात नाही, त्यामुळे कार्ड खात्यामध्ये परताव्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत रक्कम जमा दिसली नाही, तर कार्डधारकाने बँकेला तसे सूचित करणे आवश्यक आहे व त्यासोबत व्यापाऱ्याच्या क्रेडिट नोटची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
- एकापेक्षा अधिक खात्यांशी जोडलेल्या कार्डाच्या बाबतीत, व्यापारी संस्थानातील व्यवहाराची रक्कम फक्त प्राथमिक खात्यातूनच घेतली जाईल. सदर खात्यामध्ये पुरेसा निधी नसेल आणि कार्डाशी जोडलेल्या अन्य खात्यांमध्ये स्वतंत्रपणे अथवा एकत्रितरित्या पुरेसा निधी उपलब्ध असेल, तरीही बँक सदर व्यवहार नाकारेल.
- सदर कार्ड हॉटेलमध्ये चेक-इन करण्यासाठी किंवा वस्तू/सेवा खरेदीचा व्यवहार पूर्ण होण्याअगोदर अग्रीम रक्कम द्यावी लागणाऱ्या अन्य ठिकाणी/व्यापारी संस्थानांमध्ये वापरता कामा नये.
- सदर कार्ड मेल ऑर्डर/फोनवरून खरेदीकरता वापरता कामा नये. असा वापर करण्यात आल्यास तो अनधिकृत समजला जाईल आणि त्याकरता कार्डधारक पूर्णतः जबाबदार असेल.
- परदेशी मासिके/नियतकालिके यांची वर्गणी भरण्याकरता सदर कार्ड वापरता कामा नये. असा वापर करण्यात आल्यास तो देखील अनधिकृत समजला जाईल.
- बँकेने 24 तासांच्या कालावधीकरता वेळोवेळी विहित केलेल्या रकमेच्या मर्यादेपर्यंतच कार्डाचा वापर करण्याचे कार्डधारक मान्य करतो.
शुल्क
- बँकेचे डेबिट कार्ड सध्या निःशुल्क देऊ केले जाते. मात्र भविष्यात कुठलीही पूर्वसूचना न देता त्याकरता शुल्क आकारण्याचा अधिकार बँक राखून ठेवते. असे शुल्क जर आणि जेव्हा आकारले जाईल तेव्हा ते कार्डधारकाच्या प्राथमिक खात्यावर, कार्डधारकाच्या मान्यता/ बँकेच्या मर्जीने पुनर्नूतनीकरणानुसार, नावे टाकले जाईल. सदर शुल्क परत मिळणार नाही. अन्य सेवांचे आकार प्रचलित दरांनी नावे टाकण्यात येतील.
- रोख आहरण/शिलकीची विचारणा यांकरता आणि/किंवा अन्यत्र लागू असेल त्याप्रमाणे व्यवहार शुल्क, सदर व्यवहाराची नोंद (पोस्टिंग) करताना खात्यावर नावे टाकले जाईल.
- डेबिट कार्डाच्या वापरावर लागू असलेले आकार/शुल्क यांमध्ये बँक वेळोवेळी आणि कार्डधारकांना पूर्वसूचना न देताही सुधार/बदल करू शकेल.
माहिती उघड करणे
- कार्डधारक बँकेला आवश्यक वाटेल ती आणि बँक विनंती करेल तेव्हा, कुठलीही माहिती, अभिलेख वा कुठल्याही बाबीसंदर्भातली प्रमाणपत्रे सादर करेल. कार्डधारक त्याने बँकेला पुरवलेल्या माहितीची सत्यता कुठल्याही मार्गाने व आवश्यक त्या कुठल्याही स्रोतांकडून पडताळून पाहण्याचा अधिकार बँकेला प्रदान करतो. कार्डधारकाने माहिती पुरवण्यास नकार दिल्यास अथवा चुकीची माहिती पुरवल्यास, बँक स्वतःच्या मर्जीनुसार त्याच्या कार्डाचे नूतनीकरण करण्यास नकार देऊ शकेल वा कार्ड ताबडतोब रद्दबातल ठरवू शकेल.
- इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर नेटवर्कमधील बँकेच्या सदस्यतेसाठी आवश्यक वा उचित ठरणारी कार्डधारकाच्या खात्यासंबंधीची माहिती गोपनीयरित्या अन्य संस्थांना उघड करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते.,
- कुठल्याही सक्षम कार्यकक्षेचे न्यायालय, न्यायालयसमान अधिकरणे, कायदे अंमलबजावणी संस्था आणि केंद्र व राज्यशासनाचे कुठलेही अन्य विभाग यांना वा कायद्यांतील तरतुदींच्या अनुषंगाने, ग्राहकांची माहिती उघड करण्याचे अधिकारदेखील बँक राखून ठेवते.
विमा
- एखाद्या विमा कंपनीशी झालेल्या करारानुसार बँक कार्डधारकाला त्याच्या कार्डावर वेळोवेळी विविध विमा लाभ देऊ करू शकते. कार्डधारक विशेष रूपात हे मान्य करतो की, तो/ती अशा विमासंरक्षणाच्या संबंधाने वा त्यामुळे उद्भवू शकणाऱ्या कुठल्याही प्रकरणामध्ये बँकेला जबाबदार धरणार नाही, मग सदर प्रकरण अशा विमासंरक्षणातील कमतरता वा दोषाशी संबंधित असो. नुकसान भरपाईची वसुली असो वा दावा निकाली काढण्याशी निगडीत असो वा अन्य कुठल्याही प्रकारचे असो आणि अशी सर्व प्रकरणे थेट विमा कंपनीकडे दाद मागून सोडवली जातील.
- दावे निकाली काढण्याकरता सर्वस्वी विमाकंपनी जबाबदार असेल. त्याशिवाय, कार्डधारक हेही मान्य करतो की, बँक कुठल्याही क्षणी (सर्वस्वी तिच्या मर्जीनुसार आणि कार्डधारकाला कुठलीही पूर्वसूचना वा कारणे दिल्याशिवाय) अशा विमासंरक्षणाचा लाभ प्रलंबित ठेवू शकते, मागे घेऊ शकते अथवा रद्द करू शकते आणि सदर लाभ देत राहण्याचे कुठलेही बंधन बँकेवर असणार नाही.
विवरणपत्र आणि अभिलेख
- कार्डावरील व्यवहारांचे अभिलेख बँकेने जारी केलेल्या विवरणपत्रामध्ये आणि/किंवा खात्याच्या पासबुकमध्ये उपलब्ध असतील. पासबुक अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी ग्राहकाची असेल. कार्डधारकाने आपल्या कार्डाचे पासबुक आपले खाते असलेल्या शाखेमधून महिन्यातून किमान एकदा प्राप्त करणे बंधनकारक आहे. व्यवहारांच्या तपशीलाबाबत काही अनियमितता वा चूक आढळल्यास विवरणपत्राच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत कार्डधारकाने सदर गोष्ट बँकेला कळवणे आवश्यक आहे.
- कार्ड वापरून केलेल्या व्यवहारांसंबंधी बँकेचे अभिलेख निर्णायक आणि सर्व कारणांकरता बंधनकारक असतील.
विवाद
- खरेदीव्यवहारांच्या बाबतीत कार्डधारकाची स्वाक्षरी व कार्डाचा क्रमांक असलेली सेल्स स्लिप हा बँक व कार्डधारक यांच्यादरम्यान, कार्डधारकाच्या नावे असलेल्या आर्थिक जबाबदारीच्या मर्यादेपर्यंत, निर्णायक पुरावा ठरेल. कार्डधारकाला त्याने खरेदी केलेल्या वस्तू वा वापरलेल्या सेवा समाधानकारक वाटल्या आहेत किंवा नाही याची खात्री करण्याची जबाबदारी बँकेवर असणार नाही.
- असंतुष्ट कार्डधारकाच्या खाते विवरणपत्र/पासबुकामध्ये दर्शवलेले देय आकार अथवा ग्राहकाने अन्यप्रकारे जाणून घेतलेले आकार यांसंबंधीचा विवाद सोडवण्याकरता बँक अशा विवादाची सूचना प्राप्त झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत अधिकृत आणि वाजवी प्रयत्न करेल. यानंतर सदर आकार अयोग्य असल्याचे बँकेने ठरवल्यास कार्डधारकाला तसे कळवण्यात येईल.
- कुठल्याही संस्थेने तांत्रिक कारणांकरता अथवा अन्य प्रकारे कार्ड स्वीकारण्यास नकार दिल्यास त्याची कुठलीही जबाबदारी बँक स्वीकारणार नाही.
- प्रस्तुत कराराचा अर्थ भारतीय कायद्यांनुसार आणि त्यांअंतर्गत लावला जाईल. यासंबंधीचे सर्व विवाद एकमेवरित्या मुंबई, भारत येथील न्यायालयांच्या कार्यकक्षेमध्ये असतील, मग कार्ड जारी करण्याचा विनंती अर्ज बँकेच्या कुठल्याही शाखेत सादर केला गेला असो किंवा सदर प्रकरण एकाच वेळी अन्य कुठल्या न्यायालयाच्या कार्यकक्षेमध्येही येत असो.
- थकबाकीची वसुली, कायदेशीर खर्च अथवा जिथे विवाद सोडवण्याकरता कायदेशीर स्रोत वापरले गेले असतील तिथे त्यांचा खर्च अशा सर्व खर्चांची जबाबदारी कार्डधारकावर राहील.
सर्वसाधारण अटी
- कार्डधारकाच्या नोकरी आणि/किंवा कार्यालय आणि/किंवा निवासी पत्ता, ई-मेल, दूरध्वनी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक यांमध्ये कुठलाही बदल झाल्यास त्याने त्याची माहिती अभ्युदय बँकेला तात्काळ देणे आवश्यक आहे.
- कुठल्याही अटी, शर्ती, धोरणे, वैशिष्ट्ये आणि लाभ यांमध्ये भर घालणे, कमी करणे वा सुधारणा करणे यांचे अधिकार अभ्युदय बँक राखून ठेवते व सदर बदलांची माहिती www.abhyudayabank.co.in या बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. संकेतस्थळ अद्ययावत झाल्यानंतर कार्डाचा वापर करणे याचा अर्थ सुधारित अटी व शर्ती मान्य करणे असा होतो.
- एखाद्या कार्डधारकाने त्याचे कार्ड वापरून कार्डावर उपलब्ध असलेल्या शिलकीपेक्षा जास्त किंवा अभ्युदय बँकेने परवानगी दिलेल्या ओव्हरड्राफ्ट मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढून घेतल्यास कार्डधारक अभ्युदय बँकेला सर्व अतिरिक्त रक्कम त्यावरील व्याज आणि दंड, लागू असल्यास, यांसह द. सा. 18% किंवा बँक निश्चित करेल त्या दराने परत करेल. मात्र, याचा अभ्युदय बँक कुठलीही ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यास बांधील आहे असा उघड वा अध्याहृत अर्थ लावता येणार नाही.
- त्रयस्थ पक्ष कार्डधारकाला देऊ करत असलेल्या वस्तू वा सेवा, तसेच किंमतीतील सूट यांच्या दर्जाबाबत अभ्युदय बँक कुठलाही दावा करत नाही. संबंधित पक्षाची सेवा कुठल्याही प्रकारे सदोष वा असमाधानकारक असल्यास त्याकरता अभ्युदय बँक जबाबदार असणार नाही.
- डेबिट कार्डाशी संबंधित सर्व प्रकरणांमध्ये बँकेचा निर्णय अंतिम व सर्व प्रकारे बंधनकारक राहील.
बँकेच्या जबाबदारीच्या मर्यादा
खालील कारणांमुळे झालेल्या नुकसान वा हानिकरता बँक ग्राहक अथवा कुठल्याही त्रयस्थ पक्षाला नुकसानभरपाई देण्यास जबाबदार राहणार नाही:-
- ग्राहकाने दिलेल्या सूचनेच्या आधारे, सविस्तर छानबीन करून आणि वाजवी काळजी घेऊन बँकेने केलेली कुठलीही कृती.
- ग्राहकाने दिलेल्या सूचनेच्या आधारे, बँकेने चांगल्या भावनेने केलेली कुठलीही कृती.
- ग्राहकाच्या फसवणूकयुक्त अथवा निष्काळजी वर्तनामुळे जे घडले असे म्हणता येतील असे बँकेतील खात्याचा वापर करून करण्यात आलेले अनधिकृत व बेकायदेशीर व्यवहार.
- बँकेच्या संगणक प्रणाली/नेटवर्क किंवा संपर्क नेटवर्कमध्ये झालेली घुसखोरी वा हॅकिंग.
- ग्राहकाच्या खात्यामध्ये पुरेशी शिल्लक नसल्यामुळे त्याच्या कुठल्याही सूचनांचे पालन करण्यात आलेले अपयश.
- फोर्स मेजर प्रकारची घटना अथवा तांत्रिक अडचणी अथवा बँकेच्या नियंत्रणाबाहेरील कुठल्याही कारणामुळे ग्राहकाला त्याचे बँक खाते वापरण्यात आलेले अपयश.
- ग्राहकाचे बँक खाते त्रयस्थ पक्षाद्वारे अनधिकृत व बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरले जात असल्याबद्दल ग्राहकाने बँकेला न कळवल्यास.
- बँकेने ग्राहकाला त्याचे खाते आणि/किंवा कार्ड वापरण्याकरता दिलेली, पिन क्रमांक अथवा इतर पासवर्ड, कीवर्ड वा अन्य ओळखचिन्हे गोपनीय ठेवण्यात ग्राहकाला आलेले अपयश.
- ग्राहकाच्या वैयक्तिक अथवा खातेविषयक अथवा अन्य महत्त्वाच्या माहितीमध्ये झालेले बदल बँकेला कळवण्यात ग्राहकाला आलेले अपयश.
- कार्ड वा संबंधित पिन क्रमांक गहाळ झाल्यामुळे किंवा त्यांचा कुठल्याही प्रकारे वापर झाल्यामुळे उद्भवणारे कुठलेही नुकसान वा हानी. ग्राहकाकडून झालेला प्रस्तुत करारामधील कुठल्याही अन्य अटी व शर्तींचा भंग. बँक कुठल्याही परिस्थितीत, कुठलीही नुकसानभरपाई देण्यास जबाबदार राहणार नाही, मग अशी भरपाई प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, प्रासंगिक, परिणामस्वरूप अशी कुठलीही असो, तसेच एखादा दावा उत्पन्न, गुंतवणूक, निर्मिती, सद्भावना, नफा बुडणे, व्यवसायात खंड पडणे वा अन्य कुठल्याही प्रकारच्या नुकसानीशी संबंधित असला आणि तो सदर नुकसान ग्राहकाला अथवा अन्य कुठल्या त्रयस्थ पक्षाला सोसावा लागले असले, तरी त्याचा या गोष्टीशी संबंध असणार नाही.
कार्ड बंद करणे
- डेबिट कार्ड वा देऊ करण्यात आलेली अन्य कुठलीही सेवा कुठल्याही क्षणी, पूर्वसूचना वा कारण न देता रद्द करण्याचा/काढून घेण्याचा अधिकार अभ्युदय बँक राखून ठेवते.
- कार्डधारकाने रूपे कार्डचा वापर करणे थांबवण्याचा निर्णय घेतल्यास, त्याने अभ्युदय बँकेला किमान 7 दिवसांची पूर्वसूचना लेखी स्वरूपात देणे व कार्ड, तसेच आवश्यक नसल्यास अन्य अतिरिक्त कार्डे त्यांच्या चुंबकीय पट्टीमधून अनेक तुकड्यांमध्ये कापून ते बँकेला त्वरित परत करणे आवश्यक आहे. कार्डधारकाने त्याचे कार्ड नष्ट केल्याचा दावा केल्यावर प्रस्तुत अटी व शर्ती त्यावेळी लागू नसल्या, तरीही त्यानंतर रूपे कार्डावर देय झालेल्या सर्व सुविधा आणि संबंधित आकार भरण्याची जबाबदारी कार्डधारकावर राहील. रूपे कार्डावर देय झालेले सर्व आकार, मग ते गैरवापर/फसवणूकयुक्त वापरामुळे झालेले असोत वा नसोत आणि कार्ड नष्ट केल्याबद्दल बँकेला सूचित केलेले असो वा नसो, ते भरण्याची जबाबदारी कार्डधारकावर राहील.
- बँकेने जारी केलेले रूपे कार्ड ही अभ्युदय सहकारी बँक लि. ची मालमत्ता आहे आणि बँकेने तशी लेखी विनंती केल्यावर ते बँकेकडे ताबडतोब व विनाअट परत करणे आवश्यक राहील. कार्डधारकांना विनंती आहे की, त्यांनी आपले कार्ड परत करताना बँकेच्या संबंधित अधिकाऱ्याची ओळख पटवण्याची खात्री करून घ्यावी.
- खालीलपैकी कुठलीही घटना घडल्यास कार्डधारकाला लेखी पूर्वसूचना देऊन रूपे कार्ड सुविधा तात्काळ बंद करण्याचा अधिकार अभ्युदय बँकेकडे राहील व सदर कार्ड बँकेला परत केले जाईल:
- येथे नमूद केलेल्या आणि कार्डधारकाच्या, बँकेतील खात्याला लागू असलेल्या अटी व शर्तींचे पालन वा अनुपालन करण्यात अपयश आल्यास;
- बँकेसोबत केलेल्या कुठल्याही करार वा वचननाम्याचा (आनुषंगिक वा अन्यथा) भंग झाल्यास;
- कार्डधारक दिवाळे वाजणे किंवा तत्सम कुठल्याही कारवाईचा विषय बनल्यास;
- कार्डधारकाचा मृत्यू ओढवल्यास;
- कार्डाच्या वैशिष्ट्यांमध्ये बदल करणे प्रस्तावित असल्याने बँकेला सदर कार्ड, तसेच रूप कार्ड मागे घेणे आवश्यक वाटल्यास, अशी कार्डे सदर बदल अंमलात येण्याच्या तारखेपूर्वी अभ्युदय बँकेकडे परत करणे आवश्यक आहे. कार्डाच्या वैशिष्ट्यांमध्ये करण्यात येत असलेल्या कुठल्याही प्रस्तावित बदलाला, कार्डावर लागू असलेल्या आकारांना वा अटी आणि शर्तींना कार्डधारकाचा विरोध असल्यास, त्याही परिस्थितीत रूपे कार्ड अभ्युदय बँकेला परत करणे आवश्यक आहे.
इतर अटी
- कार्डाच्या वापरासंबंधीच्या अटी व शर्ती प्रस्तुत दस्तैवजामध्ये नमूद केल्याप्रमाणे आणि बँकेने त्यांमध्ये वेळोवेळी केलेल्या बदलांप्रमाणे आहेत. कार्डधारकाने कार्डाच्या अर्जावर स्वाक्षरी केल्यास, कार्डाच्या पोचपावतीवर वा कार्डाच्या मागच्या बाजूस स्वाक्षरी केल्यास, कार्ड वापरून एखादा व्यवहार केल्यास, बँकेला कार्ड कार्यान्वित करण्याची विनंती केल्यास किंवा बँकेच्या अभिलेखात असलेल्या त्याच्या पत्त्यावर कार्ड पाठवल्यानंतर 10 दिवस उलटल्यास त्याचा अर्थ कार्डधारकाने सदर अटी व शर्ती विनाअट मान्य व स्वीकृत केल्या आहेत असा घेण्यात येईल.
- प्रस्तुत अटी व शर्ती कार्डधारकाच्या कुठल्याही प्रकारच्या खात्याशी संबंधित अटी व शर्तींच्या व्यतिरिक्त असतील ऐवजी नाही. इलेक्ट्रॉनिक प्रणालीची अथवा कार्डाच्या व्यवहारांकरता वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची सुरक्षा सांभाळण्यासाठी वा पुनःप्रस्थापित करण्यासाठी आणि/किंवा अन्य कुठल्याही कारणासाठी आवश्यक वाटल्यास बँक कुठलीही पूर्वसूचना न देता अटी व शर्तींमध्ये बदलदेखील करू शकेल आणि ते कार्डधारकाला बंधनकारक असतील.
- वीजपुरवठा, संपर्क जोड खंडित होणे, यांत्रिक बिघाड वा बँकेच्या नियंत्रणाबाहेरील कुठल्याही कारणाने एटीएम कार्य करेनासे झाल्यास त्याकरता बँक जबाबदार राहणार नाही.
- कार्ड तयार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्डधारक त्याने जिथे अर्ज सादर केला असेल त्या शाखेमध्ये स्वतः जाईल आणि आपली ओळख पटवून कार्ड ताब्यात घेईल.
- बँकेला प्रदान केलेले सर्व अधिकार परत घेता येणार नाहीत.
फोर्स मेजर
बँकेच्या नियंत्रणाबाहेरील कुठल्याही कारणाने कार्डधारकाला कुठल्याही प्रकारे नुकसान वा हानी झाल्यास त्यापासून त्याला मुक्त करण्याची वा त्याची नुकसानभरपाई करण्याची जबाबदारी बँकेवर राहणार नाही.
रूपे डेबिट कार्डाच्या अटी व शर्तींसाठी ---- येथे क्लिक करा