अभ्युदय मोबाईल अप्लिकेशनद्वारे आमच्या बँकेचे ग्राहक सर्व बँकिंग सेवा आपल्या बोटांनी प्राप्त करू शकतात. आपल्या मोबाईलवर हे ॲप चालू करून तुम्ही बँकिंग व्यवहार पाहू शकता, त्वरित रोख हस्तांतरण करू शकता आणि मूल्यवर्धित सेवा प्राप्त करू शकता. यात वेळेचे बंधन नाही, तुम्ही आपल्या सोयीनुसार कुठल्याही वेळी आणि कुठूनही बँकिंग करू शकता.
अभ्युदय मोबाईल बँकिंगमध्ये खालील सेवा उपलब्ध आहेत :-
- बँकिंग सेवा
- बचत बँक/चालू/रोख पत खाते
- कर्ज खाते
- मुदतठेव/आवर्ती जमा खाते
- निधी हस्तांतरण सुविधा
- खाजगी निधी हस्तांतरण (अभ्युदय बँकेच्या शाखेतील त्याच ग्राहकाचे लिंक केलेले खाते)
- बँकेअंतर्गत निधी हस्तांतरण (अभ्युदय बँकेतीलच अन्य खात्यामध्ये निधी हस्तांतरण)
- आंतरबँक निधी हस्तांतरण (नेफ्टद्वारे दुसऱ्या बँकेतील खात्यामध्ये निधी हस्तांतरण)
- लाभार्थ्यांचे व्यवस्थापन (निवड)
- बँकेअंतर्गत (अभ्युदय बँकेच्याच दुसऱ्या) लाभार्थ्यांशी जोड
- नेफ्ट लाभार्थ्यांशी जोड
- लाभार्थ्यांची यादी बघणे/नाव कमी करणे
- आयएमपीएस (त्वरित पेमेंट सेवा) निधी हस्तांतरण
- एमएमआयडी रद्द करणे
- एमएमआयडी पुन्हा सुरू करणे
- मोबाईल क्रमांकावर आयएमपीएस निधी हस्तांतरण (पी टू पी - मोबाईलद्वारे)
- खाते क्रमांकावर आयएमपीएस निधी हस्तांतरण (पी टू ए - खाते क्रमांकाद्वारे व्यक्तीला)
- धनादेश पुस्तिकेची मागणी नोंदवणे
- शिलकीची विचारणा
- लघु विवरणपत्र
- विविध खाती एकमेकांशी जोडणे
बँकिंग विभागात ग्राहक आपल्या सर्व बचत/चालू/रोख पत खाते, कर्ज खाते, आवर्ती आणि मुदत ठेव खात्याचे विवरण प्राप्त करू शकतात. ग्राहकाला आपली विविध खाती आपल्या प्राथमिक खात्याशी जोडण्याची (लिंक) सुविधादेखील उपलब्ध आहे. तो त्याच्या वेगवेगळ्या खात्यांमधील शिल्लक तपासून पाहू शकतो, तसेच त्या खात्यांतील मागील पाच व्यवहारांचे लघु विवरणपत्रदेखील मिळवू शकतो.
निधी हस्तांतरण सुविधेअंतर्गत आपल्या खात्यांमधून दररोज प्रत्येक खात्यामध्ये रु. 50,000/- पर्यंतचा निधी हस्तांतरित करता येतात. बँके अंतर्गत एका शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये आणि आमच्या बँकेतून दुसऱ्या बँकेच्या शाखांदरम्यान निधी हस्तांतरण व्यवहारांकरता ग्राहकाने अभ्युदय मोबाईल अप्लिकेशनच्या लाभार्थी विकल्पांअंतर्गत लाभार्थ्याचे तपशील सादर करणे अनिवार्य आहे.
आयएमपीएस (त्वरित पेमेंट सेवा)
स्वतंत्र रीटेल पेमेंट सेवेमध्ये में एनपीसीआय (भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम) द्वारे सुरू करण्यात आलेली आयएमपीएस सेवा हा एक किफायतशीर आणि प्रभावी मार्ग आहे. यात ग्राहकाला एखाद्या तिसऱ्या व्यक्ती वा व्यापाऱ्याला खाजगी अथवा व्यापार उद्देशाने तात्काळ निधी हस्तांतरण करण्याची सुविधा मिळते. आयएमपीएस पेमेंट चॅनलची सुविधा आयएमपीएस (त्वरित पेमेंट सेवा) द्वारे निधी हस्तांतरणाच्या प्राप्ती आणि प्रेषणाकरता 24 तास उपलब्ध असते. यातून निधी 24x7x365 तत्त्वावर मोबाईल क्रमांक आणि एमएमआयडी (मोबाईल मनी आयडेंटिफायर) किंवा खाते क्रमांक, किंवा आयएफएससी क्रमांकाच्या साह्याने पाठवला जाऊ शकतो किंवा प्राप्त केला जाऊ शकतो. आयएमपीएस चॅनल नेफ्ट चॅनलची वेळेची मर्यादा दूर करतो.
एमएमआयडी क्रमांक
एमएमआयडी एक 7 आकडी कोड असतो, जो मोबाईल क्रमांकावर मिळवून तुम्ही आयएमपीएसद्वारे निधी हस्तांतरण आणि प्राप्ती करू शकता.
- बँकिंग सेवा
- निधी हस्तांतरण सुविधा
- निधी हस्तांतरणामध्ये खालील सोयी आहेत -
- खाजगी निधी हस्तांतरण (अभ्युदय बँकेच्या एकाच शाखेमधील, ग्राहकाच्या लिंक केलेल्या खात्यांदरम्यान आपसात) – अभ्युदय बँकेच्या एकाच शाखेमधील, ग्राहकाच्या लिंक केलेल्या खात्यांदरम्यान आपसात निधी हस्तांतरणासाठी या सेवेचा उपयोग केला जाऊ शकतो.
- बँकेच्या दोन शाखांमध्ये निधी हस्तांतरण (अभ्युदय बँकेच्या अन्य शाखेमध्ये निधी हस्तांतरण) - या सेवेद्वारे अभ्युदय बँकेच्या कुठल्याही अन्य शाखेमध्ये निधी हस्तांतरण केले जाऊ शकते.
- आंतरबँक निधी हस्तांतरण (नेफ्टद्वारे दुसऱ्या बँकेतील खात्यामध्ये निधी हस्तांतरण) - या सेवेद्वारे दुसऱ्या कुठल्याही बँकेतील खात्यामध्ये निधी हस्तांतरण केले जाऊ शकते.