एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन) द्वारे ग्राहक आपल्या बचत आणि चालू खात्यांमधून रोख रक्कम काढणे, एटीएम पिन बदलणे, तसेच शिलकीची विचारणा करणे असे व्यवहार करू शकतात.
एटीएम/रूपे डेबिट कार्ड हॉट लिस्ट करण्यासाठी :-
आमच्या बँकेमध्ये नोंदणी केलेल्या आपल्या मोबाइल क्रमांकावरून 9223110011 या क्रमांकावर डायल करा. दोन-तीन रिंग झाल्यानंतर कॉल आपोआप बंद होईल आणि प्रणालीमध्ये तुमचे कार्ड हॉट लिस्ट केले जाईल, तसेच तुम्हाला याच्या खात्रीकरता एक एसएमएस पाठवला जाईल.
आपला एटीएम/रूपे डेबिट कार्ड क्रमांक/पिन/सीव्हीव्ही कुणाही अन्य व्यक्तीला सांगू नका. नकली कॉलपासून सावध रहा. हा तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न असू शकतो. अभ्युदय बँकेतून आम्ही तुम्हाला तुमचा पिन/सीव्हीव्ही क्रमांक कधीही मागत नाही.
बँक तिच्या ग्राहकांना एटीएम-कम-डेबिट कार्ड निःशुल्क जारी करते आणि इएमव्ही डेबिट कार्डे देखील निःशुल्क जारी करणे सुरू ठेवेल. वाढते खर्च लक्षात घेता बँकेने वर्ष 2017-18 पासून सेवा शुल्काच्या स्वरुपात रु. 150 + कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही आर्थिक वर्षामध्ये जारी करण्यात आलेले कार्ड सेवा शुल्क-मुक्त आहेत. प्रधानमंत्री जन धन योजनेचे ग्राहक आणि बचत बँक युवा खात्यांचे ग्राहक यांच्याकडून शुल्क वसूल केले जाणार नाही.
एटीएमची ठिकाणे शोधण्याकरता येथे क्लिक करा
|