डिपॉझिटरी सहभागी सेल:
अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL-(IN-DP-63-2015)) सह डिपॉझिटरी सहभागी आहे.
आमच्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागांतील शाखांमध्ये सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) म्हणून आमची बँक आता डिमॅट सेवा देऊ करत आहे.
सेबी अधिसूचना :- आयपीओसाठी शुल्क भरताना गुंतवणूकदारांनी धनादेश देण्याची आवश्यकता नाही. अलॉटमेंट झाल्यास बँकेला पेमेंटचे अधिकार देण्याकरता फक्त बँकेतील खातेक्रमांक आणि अर्जावर स्वाक्षरी करणे पुरेसे आहे. यामध्ये पैसे परत मिळण्याविषयी चिंतेचे कारण नाही कारण पैसे गुंतवणूकदाराच्या खात्यामध्येच असतात.
डिमॅट खातेदारांच्या संदर्भात - सेबीची अधिसूचना : "सिक्युरीटीज बाजारामध्ये व्यवहार करण्याकरता केवायसीची पूर्तता फक्त एकदाच करायची असते – सेबीचे नोंदणीकृत मध्यस्थ (दलाल, डीपी, म्युच्युअल फंड इ.) यांच्या माध्यमातून एकदा, तर मध्यवर्ती संस्थेशी संपर्क साधताना एकदा या प्रक्रियेची पूर्तता केली जाते. त्यानंतर तुम्हाला ती करण्याची आवश्यकता नाही.''
"तुमच्या डिमॅट खात्यामध्ये अनधिकृतरित्या व्यवहार होणे टाळा --> आपल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे आपला मोबाईल क्रमांक अद्ययावत करा. सीडीएसएलकडून आपल्या डिमॅट खात्यातील सर्व प्रकारच्या डेबिट व महत्त्वाच्या व्यवहारांसंबंधी अलर्ट संदेश त्याच दिवशी मिळवत रहा...................... गुंतवणूकदारांच्या हिताकरता माहिती."
ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी क्लिक करा https://scores.gov.in
डिमॅट :-
डिमॅट ही एक अशी प्रक्रिया आहे, जिच्यात ग्राहकाच्या विनंतीवरून त्याच्याकडील कागदस्वरुपातील समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरुपात रूपांतरित केले जातात आणि त्यानंतर ते डिपॉझिटरी प्रणालीमध्ये सांभाळले जातात.
“SMART ODR Portal link”
https://smartodr.in
डिपॉझिटरी :-
समभागांची शिल्लक, तसेच त्यांचे खरेदी-विक्री व्यवहार खातेपुस्तिकेच्या रूपात पाहण्याची सुविधा डिपॉझिटरी देते. कागदी समभाग प्रमाणपत्रे बंद वा डिमटेरियलाइझ करून (जेणेकरून ती फक्त इलेक्ट्रॉनिक अभिलेखांच्या स्वरुपात उपलब्ध असेल) खात्यातील नोंदींच्या, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक रूपात परिवर्तित केली जाऊ शकतात. भारताने आता डिमटेरियलाइझेशन पद्धत अंगिकारली आहे. डिपॉझिटरी यात एखाद्या व्यापारी बँकेप्रमाणे कार्य करते. डिपॉझिटरी सेवा प्राप्त करण्याकरता गुंतवणूकदाराला कुठल्याही एका नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे (डीपी) डिमॅट खाते सुरू करावे लागते.
डिपॉझिटरी पार्टिसिपंट :-
डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) डिपॉझिटरीचा एजंट असतो, ज्याला गुंतवणूकदारांना डिपॉझिटरी सेवा देण्याचा अधिकार असतो. सेबी/डिपॉझिटरीने निश्चित केलेल्या आवश्यकतांचे अनुपालन करणाऱ्या वित्तीय संस्था, बँका, कस्टोडियन आणि शेअर दलाल डीपी म्हणून नोंदणी करू शकतात.
प्रमुख वैशिष्ट्ये
- स्पर्धात्मक आकार
- कुठल्याही शाखेतून डिमॅट सेवा
- सकाळी 8.30 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत डिमॅट सेवा