आरटीजीएस/राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधि हस्तांतरण (नेफ्ट) :
बँक आरटीजीएस, नेफ्ट सेवा पुरवते ज्यामुळे आंतरबँक निधी हस्तांतरण कुशलतापूर्वक, सुरक्षित, किफायतशीर आणि विश्वसनीय प्रकारे केले जाऊ शकते. एवढेच नाही, तर असे हस्तांतरण बँकेच्या ग्राहकाच्या खात्यामधून दुसऱ्या एखाद्या बँकेच्या ग्राहकाच्या देशभरातील कुठल्याही शाखेमध्ये केले जाऊ शकते. सर्व दिवस ही प्रणाली 24*7*365 कार्यरत असते. सर्व खातेदारांना विनंती आहे की, त्यांना आरटीजीए व नेफ्ट प्रणालीद्वारे निधी प्राप्त करण्याकरता फक्त आपल्या 15 आकडी खाते क्रमांकाचाच वापर करावा.
आरटीजीएस/नेफ्ट द्वारे निधी पाठवताना पाठवणाराने खालील माहिती देणे आवश्यक आहे :
- पाठवण्याची रक्कम
- लाभार्थीच्या बँकेचे नाव
- लाभार्थीच्या बँकेचा आयएफएससी कोड
- लाभार्थी ग्राहकाचे नाव
- लाभार्थी ग्राहकाचा सीबीएस खातेक्रमांक
- पाठवणाराचा सीबीएस खातेक्रमांक
- पाठवणाराचा मोबाइल क्रमांक
- पाठवणाराकडून लाभार्थीला सूचना, असल्यास
आरटीजीएस आणि एनईएफटीसाठी ग्राहक सुविधा केंद्र
अभ्युदय को-ओप बँक लि
व्यवस्थापक
एनईएफटी सेल,
अभ्युदय बँक बिल्डिंग,
एस.जी.बर्वे मार्ग,
नेहरु नगर, कुर्ला (पूर्व)
मुंबई 400 024
दूरध्वनी : 09653261383
ईमेल : neftcell[at]abhyudayabank[dot]net
इलेक्ट्रॉनिक पेमेंट उत्पादन - अंतर्दिश उत्पादनांची प्रक्रिया फक्त खातेक्रमांकावर आधारित आहे.
पेमेंट करण्याच्या आदेशामध्ये योग्य तपशील, विशेषतः लाभार्थीचा खातेक्रमांक, पुरवण्याची जबाबदारी पाठवणारावर/प्रवर्तकावर असते. लाभार्थ्याचे नाव आदेशामध्ये देणे अनिवार्य असल्याचे सांगितले जात असले व ते निधी हस्तांतरण संदेशामध्ये समाविष्ट केले जात असले, तरी निधी जमा करण्याकरता फक्त खाते क्रमांकावरच विश्वास ठेवला जातो. सदर जबाबदारी शाखेमध्ये केलेली विनंती आणि ऑनलाइन/इंटरनेट वितरण प्रणालीद्वारे केली जाणारी विनंती, या दोन्हींकरता लागू आहे. (अधिक तपशीलांकरता भारतीय रिझर्व बँकेचे दिनांक 14 ऑक्टोबर, 2010 चे परिपत्रक क्र. भारिबँक/2010-11/235 डीपीएसएस (सीओ) ईपीपीडी क्र./863/04.03.01/2010-11 पहा). त्यामुळे, केवळ लाभार्थ्याच्या खातेक्रमांकाच्या आधारेच निधी जमा होतो. लाभार्थ्याचे नाव इ. तपशीलांचा वापर केला जात नाही. म्हणूनच, इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण करतेवेळी लाभार्थ्याच्या खातेक्रमांकाच्या बाबतीत निधी पाठवणाराने काळजी घेणे आवश्यक आहे.