इतर उत्पादक विकासकामांवर लक्ष देऊन आपल्या संस्थेची व तिच्या सदस्यांची उत्पादकता वाढवा.
सोसायटी व तिच्या सभासदांचे लाभ
- सामायिक देखभाल वर्गणीच्या वसुलीसाठी कमा वा शून्य प्रयत्न.
- सोसायटीच्या अभिलेख आणि कागदपत्रांच्या देखभालीचा त्रास कमी
- वेळ व कष्टांची बचत
- धनादेश जमा करण्याची आवश्यकता नाही आणि तो वटण्याकरता कुठलीही कारवाई करण्याची गरज नाही
- सोसायटीच्या खात्यासाठी निःशुल्क धनादेश पुस्तिका सुविधा
- सहकारी हाऊसिंग सोसायट्यांच्या सभासदांना शून्य शिल्लक सुविधा
- सोसायटीच्या सभासदांना धनादेश पुस्तिका व एटीएमची सोय हवी असल्यास कमीत कमी रु. 1000/- किमान शिल्लक सांभाळण्याची अट.
योजनेचे तपशील
- सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- हाऊसिंग सोसायटी व तिच्या सभासदांनी केवायसी नियमांची पूर्तता करणे आवश्यक
- खालील अटींच्या अधीन राहून बिलिंग सेवा दिली जाते.
- 20 किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायट्या -सोसायटीच्या सर्व सभासदांनी बँकेमध्ये बचतखाते सुरू करणे
- 20 किंवा त्यापेक्षा अधिक सभासद असलेल्या सोसायट्या - सोसायटीच्या 75% सभासदांनी किंवा किमान 20 सभासदांनी, यांपैकी जी संख्या अधिक असेल ती, बँकेमध्ये बचतखाते सुरू करणे
- बचतखाते ठेवणाऱ्या सभासदांनी देखभाल वर्गणी डेबिट करण्याकरता स्थायी सूचना देणे आवश्यक आहे.
- सोसायटीच्या सभासदांनी बिलिंग सेवा सुविधा मिळण्याकरता शाखेकडे रीतसर ठराव सादर करणे आवश्यक आहे.
- देखभाल वर्गणी वसूल करण्याकरता शाखेला बिलांचे विवरणापत्र तयार करणे आवश्यक आहे.
- सोसायटीच्या खात्यामध्ये एकटा सभासद अथवा पदाधिकाऱ्याने सादर केलेल्या रोख रकमा स्वीकारता येणार नाहीत.
- तयार झालेल्या देखभाल पावत्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्याच्या हाती सुपूर्द करून त्याच्याकडून त्याची पावती घेतली जाईल.