11. |
मी अभ्युदय बँकेच्या कुठल्याही शाखेमधून रोख रक्कम काढू शकतो काय? |
उत्तर: |
होय. बचत खात्यामधून कमाल रु. 50,000/- आणि सीडी/ एफएलएक्सएलएन/एसओडी खात्यांमधून रु. 1,00,000/- दररोज काढता येतात. दुसऱ्या शाखेतील त्रयस्थ पक्षाला पैसे द्यायचे असल्यास ज्याचे नाव धनादेशावर आहे त्याच व्यक्तीला त्याची ओळख पटवल्यानंतर पैसे देण्यात येतील. |
|
|
12. |
वसुलीकरता मी अभ्युदय बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये धनादेश सादर करू शकतो काय? |
उत्तर: |
होय. |
|
|
13. |
अज्ञान व्यक्ती किती वयानंतर आपले खाते स्वतः चालवू शकते? |
उत्तर: |
14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर. |
|
|
14. |
भारतीय रिझर्व बँकेने प्रसिद्ध केलेल्या सूचीनुसार अधिकृत केंद्रांमध्ये बाह्य धनादेशांच्या समाशोधनासाठी त्वरित समाशोधन सुविधा उपलब्ध आहे काय? |
उत्तर: |
चेक ट्रंकेशन प्रणाली (सीटीएस) कार्यान्वयित झाल्यापासून त्वरित समाशोधन सुविधा बंद करण्यात आली आहे. |
|
|
15. |
खाते निष्क्रिय केव्हा होते? |
उत्तर: |
24 महिन्यांच्या कालावधीपेक्षा अधिक काळ खात्यामध्ये व्यवहार न झाल्यास बँकेच्या अभिलेखामध्ये ते निष्क्रिय खाते म्हणून वर्ग केले जाते. |
|
|
16. |
एकट्या व्यक्तींना टीडीएस केव्हा लागू होतो? |
उत्तर: |
सर्वसामान्य नागरिकांसाठी वित्तीय वर्षात मुदत ठेवींवरील व्याज रक्कम रू .4०,००० / - पेक्षा जास्त असेल. जर ग्राहक ज्येष्ठ नागरिक म्हणजेच aged 6० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असतील तर व्याज रक्कम रू.50,000/- पेक्षा जास्त असल्यास टीडीएस लागू होईल.
|
|
|
17. |
मुदतठेवींवर अतिरिक्त व्याजाचा लाभ घेण्याकरता किमान वयोमर्यादा काय आहे? |
उत्तर: |
60 वर्षे |