आपल्या ग्राहकांपर्यंत विविध उत्पादने आणि सेवा उत्तम प्रकारे पोहोचवण्याकरता बँकेने एक परस्परक्रियायुक्त असे संकेतस्थळ तयार केले आहे. बँकेने कोअर बँकिंग सोल्यूशन (सीबीएस) तंत्रज्ञानही यशस्वीरित्या कार्यान्वित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या साह्याने बँक ग्राहकांना कुठल्याही शाखेतून बँकिंग करण्याची सेवा देते. तसेच बँक अभ्युदय मोबाइल बँकिंग सेवा देखील पुरवते, ज्याद्वारे ग्राहक आपले आंतरशाखीय व आयएमपीएस प्रकारचे निधि हस्तांतरण व्यवहार स्वतःच करू शकतात. मोबाइल बँकिंग सेवेद्वारे ग्राहक संक्षिप्त विवरणावरून आपली शिल्लक तपासू शकतात, धनादेश पुस्तिका मागवू शकतात व अन्य अनेक प्रकारच्या सेवांचा देखील लाभ घेऊ शकतात. ग्राहक बँकेच्या कुठल्याही शाखेतून रोख रकमेची देवाणघेवाण, हस्तांतरण, समाशोधन, प्रेषण इ. व्यवहार करू शकतात. बँक अभ्युदय रूपे डेबिट कार्ड, अभ्युदय रूपे कार्ड सुद्धा आणले आहे, आॅफसाईट एटीम बसवले आहेत. ज्याद्वारे रोख रक्कम काढणे, संक्षिप्त खाते विवरण मिळवणे आणि अन्य चौकशी करणे, तसेच पॉस केंद्रांवर खरेदी व्यवहारही करता येतात. अभ्युदयनगर आणि घाटकोपर येथे बँकेने ऑफसाइट एटीएम बसवले आहे. मनीग्राम व एक्स्प्रेस मनीसारखे परकीय चलन आणि रोख हस्तांतरण व्यवहार करण्याची सेवादेखील बँक पुरवते. त्याचप्रमाणे बँक टेलिबँकिंग आणि इंटरनेट सेवादेखील देते. आमच्या बँकेचे ग्राहक ई-मेल द्वारे आपल्या खात्यांची मासिक विवरणपत्रे मिळवू शकतात. न्यू पनवेल, वाशी आणि नेहरुनगर येथे बँकेने रोख रक्कम भरण्याची यंत्रे बसवली आहेत. पुढील काळात अशी यंत्रे अन्य शाखांमध्येही बसवण्यात येतील.
बँकिंग सेवा सामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याकरता, तसेच आर्थिक समाविष्टता(फायनान्शियल इन्क्लुजन) राष्ट्रीय ध्येय पूर्ण करण्याकरता बँकेने पंतप्रधान जन धन योजना - (पीएमजेडीवाय) कार्यान्वित केली आहे. पंतप्रधान जीवन ज्योति बीमा योजना - (पीएमजेबीवाय) आणि पंतप्रधान सुरक्षा बीमा योजना - (पीएमएसबीवाय) या योजनादेखील बँकेने कार्यान्वित केल्या आहेत. ग्राहकांना आधार कार्डावर आधारित थेट रोख हस्तांतरण सेवा (सहायकी) देण्याकरता बँकेने अर्थमंत्रालय, नवी दिल्ली यांच्या परियोजना, सीपीएसएमएस (केंद्रीय योजनाबद्ध सेवांची देखभाल योजना) मध्ये नोंदणी केली आहे.
बँकेने भारतीय रिझर्व बँकेच्या आरटीजीएस, एनएसीएच, नेफ्ट, त्वरित समाशोधन इ. अन्य सेवादेखील अंगिकारल्या/कार्यान्वित केलेल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय जीवन बीमा निगम, द न्यू इंडिया एश्श्युरन्स कंपनी लिमिटेड आणि रेलिगेर हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड या कंपन्यांची कार्पोरेट एजन्सीदेखील घेतली आहे. आमच्या सर्व शाखांमध्ये भारतीय जीवन बीमा निगमच्या सर्व प्रकारच्या जीवन विमा पॉलिसी, द न्यू इंडिया एश्श्युरन्स कंपनी लिमिटेडच्या सर्व प्रकारच्या सामान्य विमा पॉलिसी आणि आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध आहेत.
एकूण 109 शाखांपैकी 18 शाखा ग्राहकांना सप्ताहाच्या सातही दिवस सेवा पुरवतात. एनएफएस नेटवर्कच्या सहकार्याने देशभर कार्यरत असलेल्या, अन्य बँकांच्या 223 लाखांहून अधिक एटीएम्स वर आमच्या बँकेचे ग्राहक व्यवहार करू शकतात व आमच्या बँकेच्या 113 एटीएम्स वर अन्य बँकांचे ग्राहक व्यवहार करू शकतात. अभ्युदयनगर आणि घाटकोपर येथे बँकेने ऑफसाइट एटीएम बसवले आहेत. आपल्या शाखांच्या जाळ्याद्वारे बँक डी-मॅट, पॅन कार्ड सुविधा आणि ऑनलाइन करभरणा सेवा देखील देते. सामान्य जनतेसाठी आमच्या वाशी आणि न्यू पनवेल शाखांमध्ये ''फ्रँकिंग सेवा'' सुद्धा उपलब्ध आहे. वाशी शाखेच्या आवारात बँकेचे स्वतःचे एक सुसंघटित कर्मचारी प्रशिक्षण महाविद्यालय आहे, जिथे बँकिंग क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याकरीता आणि त्यांच्यामध्ये स्पर्धात्मकता निर्माण करण्याकरता आमच्या कर्मचाऱ्यांना कौशल्यशिक्षण दिले जाते.
ग्राहक शिक्षण अभियानाअंतर्गत वाशी मध्ये बँकेने आर्थिक साक्षरता कक्ष स्थापन केला आहे. अधिक चांगली ग्राहक सेवा देण्याकरता बँकेने अनेक प्रकारची पावले उचलली आहेत, जसे ग्राहकांच्या सोयीकरता टोल फ्री नंबर ची सोय(1800-22-3131), जेणेकरून बँकेच्या उत्पादने आणि सेवांशी संबंधित माहिती मिळवू शकतील. टोल फ्री नंबर (1800-313-5235) वर शिलकीच्या विचारणेकरता मिस्ड कॉल सुविधा, कार्ड ब्लॉक करण्याकरता कार्ड हॉट लिस्टिंग क्रमांक (9223110011) अशा सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय, नियमित कालावधीनंतर ग्राहक सभांचे आयोजन, स्वतंत्र ग्राहक देखभाल विभागाची निर्मिती, वयोवृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग ग्राहकांकरता विशेष काउंटरची व्यवस्था अशा गोष्टीही करण्यात आलेल्या आहेत.