आयडीबीआरटीचा उत्कृष्ट बँक पुरस्कार
बँकेने वर्ष 2014-15 करता 'माहिती आणि तंत्रज्ञानाधिष्ठित सहकारी बँक प्रकारातील प्रतिष्ठित असा आयडीबीआरटी सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार पटकावला आहे.
"अत्यधिक रूपे कार्ड जारी करणाऱ्या बँकांपैकी एक"
वर्ष 2011 साठी उत्कृष्ट तंत्रज्ञान बँक
सहकारी बँक वर्गामध्ये भारतीय बँक संघाद्वारे "वर्ष 2011 ची सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बँक " (प्रथम रनर-अप)
वर्ष 2010 साठी तंत्रज्ञान बँक
बँकिंग तंत्रज्ञानामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वर्ष 2010 साठी तंत्रज्ञान बँक म्हणून
भारतीय बँक संघाचा पुरस्कार
एनयूसीबीएफएल, मुंबई यांचा वर्ष 2010-11 साठीचा
पहिला उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार
बँकिंग व्यवसायातील तीन क्षेत्रे, म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापन, विपणन आणि ग्राहक सेवा यांमध्ये बँकेने 3 पुरस्कार मिळवले आहेत, तसेच कार्यपालन व्यवस्थापनामध्ये श्रेष्ठता पुरस्कार मिळवलेला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यांमध्ये बँकेच्या शाखा आहेत. सामान्य विमा पॉलिसींच्या विक्रीकरता बँकेने न्यू इंडिया अश्श्युरन्स कंपनी लिमिटेडची कार्पोरेट एजन्सी घेतलेली आहे. आर्थिक वर्ष 2011-12 मध्ये 15 शाखा उघडून शाखांची संख्या 111 पर्यंत वाढवणे आणि रु.11,300 कोटीची उलाढाल करणे हे बँकेचे लक्ष्य आहे. बँकेचे कमाल भांडवल पर्याप्तता प्रमाण 16.07% आहे. लवकरच आम्ही रु.10,000 ची उलाढाल आणि 100 एटीएम केंद्रे साध्य करणार आहोत.
अभ्युदय बँकेचे उपाध्यक्ष श्री. नित्यानंद प्रभू, वरिष्ठ संचालक श्री. संदीप घनदाट, हरिहर जयस्वर आणि श्री. डी. जी. कुर्लावाला, सरव्यवस्थापक पुरस्कारांसोबत
बँकेला बँकिंग फ्रंटियरचे उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार, उत्कृष्ट समग्र बँक, उत्कृष्ट सीआरएम बँक तसेच उत्कृष्ट आउटसोर्सिंग बँक असे पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
''आर्थिक वर्ष 2011-12 साठी मोठ्या सहकारी बँकांच्या वर्गात बँकिंग फ्रंटियरने दिनांक 12 ऑक्टोबर, 2012 रोजी बँकेला चार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल, उत्कृष्ट अध्यक्ष अवार्ड, उत्कृष्ट समग्र बँक पुरस्कार, उत्कृष्ट सीआरएम (ग्राहक संबंध व्यवस्थापन) बँक तसेच उत्कृष्ट आउटसोर्सिंग बँक असे पुरस्कार प्रदान केले."
वर्ष 2007-08 साठी ''सर्वोत्तम नागरी सहकारी बँक'' पुरस्कार (रु. 500 कोटींपेक्षा अधिक ठेवींच्या वर्गामध्ये)
द महाराष्ट्र नागरी सहकारी बँक संघ, मुंबई तर्फे,
श्री. आनंदराव अडसूळ, खासदार आणि महाराष्ट्र नागरी सहकारी बँक संघ, मुंबईचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत,
डॉ. कृष्ण बी. लव्हेकर, आयएएस, सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे रजिस्ट्रार यांच्या शुभहस्ते आमचे अध्यक्ष माननीय श्री. सीताराम सी. घनदाट, एमएलए यांना “सर्वोत्तम नागरी सहकारी बँक” पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक महासंघ, लि., मुंबई यांचे प्रथम पारितोषिक
आर्थिक वर्ष 2010-11 करता महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक महासंघ, लि., मुंबई यांनी अभ्युदय बँकेची सर्वोत्तम बँक म्हणून प्रथम पारितोषिकासाठी निवड केली. बँकेच्या शाखा महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यांमध्ये पसरलेल्या आहेत. सामान्य विमा पॉलिसींच्या विक्रीकरता बँकेने न्यू इंडिया अश्श्युरन्स कंपनी लिमिटेडची कार्पोरेट एजन्सी घेतलेली आहे. वर्ष 2011-2012 करता बँकेने 111 शाखा सुरू करण्याचे आणि एकूण व्यवसाय रू. 11,300 कोटींपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. त्यापैकी रू. 10,000 कोटी एकूण व्यवसायाचा टप्पा बँक थोड्याच दिवसात साध्य करेल.
अभ्युदय बँकेचे उपाध्यक्ष श्री. नित्यानंद प्रभू, व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय मोर्ये, सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. आनंदराव अडसूळ आणि बँकेचे संचालक सर्वश्री मारुती मेहेत्रे, हरिहर जयस्वर, मोहन घनदाट, जयंतीलाल जैन व के. टी. कदम.
वर्ष 2015 साठीचा सर्वोत्तम तंत्रज्ञान बँक पुरस्कार
भारतीय बँक महासंघाने 11 फेब्रुवारी, 2015 रोजी आयोजित केलेल्या बँकिंग तंत्रज्ञान परिषद, प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळा, 2015 मध्ये, सहकारी बँकांमधील या वर्षाची सर्वोत्तम तंत्रज्ञान बँक या वर्गात अभ्युदय सहकारी बँकेची प्रथम पारितोषिकाकरता निवड करण्यात आली.