- खाते कोण सुरू करू शकते :
- कुठलीही व्यक्ती तिच्या नावाने
- एकापेक्षा अधिक व्यक्ती संयुक्तपणे (कमाल 4 व्यक्ती)
- अशिक्षित व्यक्ती
- दृष्टीहीन / दृष्टीदोष असलेल्या / विकलांग व्यक्ती
- कायद्याने अज्ञान असलेल्या व्यक्तीच्या नावे व वतीने पालक
- क्लब, संघ (फक्त नोंदणीकृत असल्यास)
- स्थानिक मंडळे, सर्व प्रकारच्या सहकारी संस्था वा अन्य कुठलेही मंडळ
- बँकेचे कर्मचारी
- वयाची 14 वर्षे पूर्ण केलेले विद्यार्थी.
- व्याजदर:
व्याज डेली प्रोडक्ट तत्त्वावर @ 2.75% द. सा. दराने ठरवले जाईल आणि ते दोन सहामाहींनंतर मार्च व सप्टेंबर महिन्यांमध्ये खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
- खाते पुस्तक: प्रत्येक बचतखाते ठेवीदाराला त्याचा/तिचा खाते क्रमांक, नाव, पत्ता, तारीख, रक्कम आणि अन्य तपशीलांसह व्यवहार दर्शवणारे खातेपुस्तक देण्यात येईल.
नैमित्तिक आकार: खात्यामध्ये (धनादेशपुस्तिकेची सुविधा असलेल्या वा नसलेल्या सर्व खात्यांकरता) किमान रू. 500/- शिल्लक न सांभाळल्यास बँक वेळोवेळी लागू असलेल्या दराने नैमित्तिक आकार लागू करेल.
इतर नैमित्तिक आकारांसाठी या संकेतस्थळावर अन्यत्र दिलेले आमचे सेवा आकार पहा.
- बचत खात्याकरता प्राथमिक रोख ठेव आणि किमान शिल्लक:
With / धनादेशपुस्तिकेच्या सुविधेसह वा सुविधेविना - रू. 500/-
- एबीबी व्यवहार :-एका दिवसाची स्वतःकरता आहरण मर्यादा रू. 50,000/ आणि त्रयस्थ पक्षाकरता रू. 25,000/-.
|
खाते सुरू करण्यासाठीच्या आवश्यकता :
- सर्वसाधारण :
- दोन अद्ययावत फोटो
- बँकेच्या दृष्टीने समाधानकारक असलेला निवासी पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बिल इ.)
- फोटोसहित ओळखीचा पुरावा
- पॅन (PAN) कार्डाची छायाप्रत व पडताळणीकरता मूळ पॅन कार्ड किंवा फॉर्म 60/61 मध्ये घोषणा.
- प्रारंभिक रोख ठेव रक्कम.
- विहित किमान शिल्लक न ठेवल्यास, विहित दराने आकार खात्यावर तिमाही तत्त्वावर नावे टाकले जातील.
- जारी केलेले धनादेश अपुऱ्या निधीमुळे वारंवार न वटता परत जात असतील किंवा संबंधित खाते अनियमित/असमाधानकारक समजले जात असेल, तर असे कुठलेही खाते बंद करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते.
- 2 वर्षांपेक्षा अधिक काळ न वापरलेले खाते अकार्यरत/डॉर्मंट समजले जाईल.
- सदर नियमांमध्ये वेळोवेळी बदल वा सुधारणा करण्याचा आणि ते रद्द करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते.
|