बँकिंग व्यवसाय करणारी एक बँकिंग कंपनी या नात्याने आम्ही प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरींग अधिनियम, 2002 मधील तरतुदी आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेले नियम, तसेच रिझर्व्ह बँकेने ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) धोरणासंबंधी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास वैधानिकरित्या बांधील आहोत.
आमच्या बँकेमध्ये नवीन खाते सुरू करण्यासाठी, तसेच आमच्या व्यक्ती, एकमालक संस्था, संयुक्त खातेधारक/भागीदार/संचालक/विश्वस्त/हिंदू अविभक्त कुटुंब सदस्य अशा विविध विद्यमान खातेदार व अधिकृत स्वाक्षरीकर्त्यांकरता, खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
ओळखीचा पुरावा: (खालीलपैकी कुठलाही एक)
- पासपोर्ट
- मतदार ओळखपत्र
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- आधार कार्ड
- शासकीय /कंपनीचे ओळखपत्र
- बँकेच्या दृष्टीने समाधानकारक असलेला अन्य दस्तैवज.
निवासी पत्त्याचा पुरावा: (खालीलपैकी कुठलाही एक)
- शिधापत्रिका
- वीजबिल
- दूरध्वनी बिल
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- बँकेच्या दृष्टीने समाधानकारक असलेला अन्य दस्तैवज
विश्वस्त संस्था व न्यासांची खाती
- विश्वस्त, निवासी, लाभार्थी आणि स्वाक्षरीचे अधिकार असलेल्या व्यक्तींची ट्रस्ट डीड/योजनेमध्ये असलेल्याप्रमाणे नावे व शेड्युल 1 ची धर्मादाय आयुक्त अथवा जागतिक बँकेची स्वाक्षांकित प्रत
- संस्था नोंदणीकृत असल्यास नोंदणी प्रमाणपत्र
- विश्वस्त, निवासी, लाभार्थी आणि पॉवर ऑफ अटॉर्नीधारकांची ओळख पटवणारे कुठलेही अधिकृत कागदपत्र, त्यांच्या पत्त्यांसह.
- व्यवस्थापकीय मंडळ/विश्वस्त मंडळाचा खाते सुरू करण्या व चालवण्याकरताचा ठराव
अद्ययावत फोटो (पासपोर्ट आकाराचे) – दोन
ओळख पटवण्याची वरील कार्यपद्धत नवीन, तसेच सर्व विद्यमान ग्राहकांना लागू आहे व ती वेळोवेळी पुन्हा पूर्ण करणे आवश्यक असेल.
त्यामुळे, आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना विनंती करतो की, त्यांना वरील कागदपत्रे व (अ) आणि (ब) या कागदपत्रांच्या प्रती त्यांचे खाते असलेल्या शाखेमध्ये सादर करावीत. (अ) आणि (ब) ही मूळ कागदपत्रे पडताळणीनंतर परत करण्यात येतील व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती बँकेकडे राहतील.
आपल्याला अधिक चांगली सेवा देऊ शकण्याकरता बँकेकडे तुमचे सद्य आणि अचूक पत्ते असणे आवश्यक आहे, जेणेकरून बँकेचा पत्रव्यवहार तुमच्यापर्यंत पोहोचूशकेल. आमच्या अभिलेखांमधील तुमचा पत्ता अद्ययावत आणि अचूक असल्याची कृपया खात्री करून घ्या. एकट्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य खात्यांच्या बाबतीत, संबंधित वैधानिक कागदपत्रे, जसे मेमोरँडम आणि आर्टिकल्स ऑफ असोशिएशन, व्यवसाय सुरू केल्याचे प्रमाणपत्र, ट्रस्ट डीड, ठराव इ. आवश्यकतेनुसार सादर करणे गरजेचे आहे.
प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरींग अधिनियम, 2002, (पीएमएलए) नुसार जी व्यक्ती वा संस्था जाणता वा अजाणता, गुन्हेगारी मार्गाने मिळवलेल्या संपत्तीशी संबंधित असेल वा तिच्या व्यवहारांमध्ये गुंतलेली असेल व अशी संपत्ती निर्दोष असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करेल, ती मनी लाँडरींगच्या गुन्ह्यामध्ये दोषी मानली जाईल.
अनुपालन अधिकारी आणि प्रधान अधिकारी
अभ्युदय सहकारी बँक लि, मुख्य कार्यालय.
संपर्क :-1ला मजला, अभ्युदय बँक बिल्डिंग, अभ्युदय बँक मार्ग, सेक्टर 17, नवी मुंबई-400705. दूरध्वनी क्र.: 022-27890664