अनिवासी भारतीयांकरता विविध ठेवयोजना
भारतीय मूळ/राष्ट्रीयत्व असलेल्या अनिवासी व्यक्ती अभ्युदय सहकारी बँक लि. मध्ये खालील प्रकारची अनिवासी खाती सुरू करू शकतात :
अनिवासी (बाह्य) रूपये खाते (एनआरई)
- या अंतर्गत तुम्ही सुरू करू शकत असलेली खाती म्हणजे बचत, चालू आणि भारतीय रूपयांमधील ठेवखाते.
- तुम्ही एनआरई खाते खालील मार्गांनी सुरू करू शकता :
- परदेशांतून पैसे पाठवणे (स्विफ्ट पेमेंट ऑर्डरद्वारे).
- भारतातील अन्य बँकांमधील अथवा आमच्या बँकेच्या अन्य शाखांमधील विद्यमान एनआरई/एफसीएनआर खात्यामधून निधी हस्तांतरण करणे.
- भारताला काही काळाकरता भेट देताना सोबत आणलेल्या परकीय चलनाच्या नोटा/प्रवासी धनादेशांद्वारे.
एनआरई खात्याची अद्वितीय वैशिष्ट्ये
- व्याजासह संपूर्ण जमा रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेशी संबंध न येता भारताबाहेर नेता येते.
- एनआरई खाते पॉवर ऑफ अटॉर्नीच्या किंवा एनआरआय खातेधारकाने जारी केलेल्या अधिकारपत्राच्या आधारे निवासी भारतीयांद्वारे चालवले जाऊ शकते. मात्र, पीओए/एलएधारक परदेशांतील निधी भारतामध्ये आणू शकत नाही.
- अन्य अनिवासी भारतीयांसोबत संयुक्त खाते सुरू करता येते. भारतामध्ये राहात असलेल्या जवळच्या नातेवाईकांसोबतदेखील (कंपनी कायदा, 1956 च्या कलम 6 मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे), “पहिला वा हयात खातेदार” या तत्त्वावर संयुक्त खाते सुरू करता येते. निवासी जवळचे नातेवाईक पीओएधारक या नात्याने, अनिवासी खातेधारकाने हयात असताना दिलेल्या सूचनांनुसार खाते चालवण्यास पात्र असतील.
- स्थानिक वाटप, यूटीआयच्या युनिट्सची खरेदी, केंद्र आणि राज्य सरकारच्या सिक्युरिटीज आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांची खरेदी या खात्यामधून करता येते.
- मूळ या खात्यामधून खरेदी केलेल्या यूटीआयचे युनिट्स, सिक्युरिटीज आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांच्या विक्री/मुदतपूर्ती/पुनर्खरेदीद्वारे प्राप्त झालेला निधी आरबीआयचा संबंध न येता खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो.
- मुदतठेवींअंतर्गत ठेवी किमान 1 वर्ष व कमाल 3 वर्षांच्या मुदतीकरता स्वीकारल्या जातात.
- ठेवीदार/भारतातील त्रयस्थ पक्षांना सदर ठेवी तारण म्हणून देऊन कर्ज मिळवता येते.
- एनआरई बचत खात्याकरता धनादेश पुस्तिकेची सुविधा उपलब्ध आहे.
- मिळालेले व्याज करपात्र नाही. खात्यातील शिलकीवर संपत्तीकर लागू नाही.
- आरबीआयच्या ताज्या मार्गदर्शनानुसार देशांतर्गत ठेवींना लागू असलेल्या आकर्षक व्याजदरांप्रमाणेच दर देऊ केले जाऊ शकतात.
अनिवासी सामान्य खाते (एनआरओ)
एनआरओ खात्याचा मुख्य उद्देश, व्यक्तीने अनिवासी भारतीय होण्यापूर्वी किंवा अनिवासी असताना भारतामध्ये मिळवलेल्या भारतीय रूपयांचे, परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 व विनिमय नियंत्रण नियमांमधील तरतुदींचा भंग न करणारे वैध व्यवहार पूर्ण करणे हा आहे.
- एनआरओ खाती बचत, चालू किंवा भारतीय रूपयांमधील मुदतठेव खात्यांच्या स्वरुपात सुरू करता येतात.
- एनआरओ खात्यातील निधी वैध कारणांकरता व लागू असलेले कर भरण्याच्या अधीन, प्रति कॅलेंडर वर्षाला एकूण एक दशलक्ष यूएसडी या मर्यादेपर्यंत भारताबाहेर पाठवला जाऊ शकतो. आरबीआयच्या ताज्या मार्गदर्शनानुसार अनिवासी भारतीय व्यक्ती एनआरओ खात्यामधून एनआरई खात्यामध्ये प्रति आर्थिक वर्ष एकूण एक दशलक्ष यूएसडी या मर्यादेपर्यंत आणि कर भरण्याच्या अधीन राहून, हस्तांतरित करण्यास पात्र आहे.
- ठेवींवर प्राप्त झालेले व्याज वेळोवेळी लागू असलेल्या टीडीएससाठी पात्र आहे. दुहेरी कर प्रतिबंधक करारांतर्गत लाभ काही अटींवर मिळवले जाऊ शकतात.
- देशांतर्गत ठेवींकरता लागू असलेले प्रचलित व्याजदर एनआरओ ठेवींना लागू आहेत.
- ठेवीदार/भारतातील त्रयस्थ पक्षांना सदर ठेवी तारण म्हणून देऊन भारतामध्ये कर्ज मिळवता येते.
फॉरीन करन्सी नॉन रेसिडेंट खाते (एफसीएनआर – बँका)
परकीय चलनाच्या दरांमधील उतारचढावांच्या धोक्यापासून सुरक्षित राहण्याकरता एक अद्वितीय योजना.
एफसीएनआर (बी) ची वैशिष्ट्ये :
- खाते परकीय चलनामध्ये सांभाळले जाते आणि फक्त मुदतठेवीच्या स्वरुपातच ठेवले जाते.
- आमच्या बँकेमध्ये एफसीएनआर (बी) खाते यूएसडी, जीबीपी, युरो आणि जपानी येन या चलनांमध्ये सुरू करता येते.
- पैसे अन्य परकीय चलनांमध्येदेखील पाठवता येऊ शकतात. ते पाठवणाराने निर्देश दिल्याप्रमाणे कुठल्याही निर्दिष्ट चलनामध्ये बदलून घेण्यात येतील.
- मुदतठेवींअंतर्गत ठेवी किमान 1 वर्ष व कमाल 5 वर्षांच्या मुदतीकरता स्वीकारल्या जातात.
- ठेव ज्या चलनामध्ये असेल, त्यामध्येच व्याज देण्यात येईल. प्रचलित विनिमय दराने विनिमयास परवानगी आहे.
- मिळालेले व्याज करपात्र नाही. खात्यातील शिलकीवर संपत्तीकर लागू नाही.
- ठेवीदार/भारतातील त्रयस्थ पक्षांना सदर ठेवी तारण म्हणून देऊन भारतामध्ये कर्ज मिळवता येते.