स्पीड क्लियरींग याचा अर्थ स्थानिक समाहरणाद्वारे बाहेरगावचे धनादेश स्वीकारणे. या सेवेमुळे ज्या बँकांच्या कोअर बँकिंग असलेल्या बाहेरगावच्या शाखांवर धनादेश काढलेले असतील, त्या बँकांची एखादी नेटवर्कवर जोडलेली स्थानिक शाखा असेल, तर असे धनादेश संकलित करण्याची सुविधा मिळते. स्पीड क्लियरींगचा उद्देश बाहेरगावचे धनादेश वटवण्यासाठी लागणारा कालावधी कमी करणे हा आहे. सीबीएसच्या वातावरणात, धनादेश कुठल्याही ठिकाणी जारी केलेले असले, तरी ते शारीर रूपात त्याच शाखेला जाण्याची गरज न पडता वटवले जाऊ शकतात.
शासकीय धनादेश वगळता, सीबीएस सुरू असलेल्या शाखांच्या नावे काढलेली सर्व प्रकारच्या व्यवहारप्रकारांमधील इन्स्ट्रुमेंटस् स्पीड क्लियरींगमध्ये सादर केली जाऊ शकतात.
स्पीड क्लियरींगद्वारे धनादेश संकलित करण्यासाठीच्या सेवा शुल्काच्या माहितीसाठी कृपया अन्यत्र पहा.