अभ्युदय सहकारी बँक लिमिटेड
के. के. टॉवर, जी. डी. आंबेडकर मार्ग, परळ गाव,
मुंबई - 400012
कर्जदात्यांकरता उचित व्यवहार संहिता (एफपीसीएल) म्हणजे भारतामध्ये ग्राहकांसोबत व्यवहार करताना सर्वोत्तम प्रथांचे पालन साध्य करणे होय व आमच्या बँकेने ही संहिता स्वेच्छेने अंगिकारली आहे.
ही संहिता ग्राहकांना बहुमूल्य माहिती देईल व बँकेबरोबर ग्राहकांना प्रभावी संवाद साधण्याची सोय देईल.
एफपीसीएल बँकेच्या संकेतस्थळावर किंवा प्रसारमाध्यमांतून जाहीर केलेल्या तारखेपासून बँकेमध्ये लागू केली जाईल.
एफपीसीएल आमच्याकडून 8 महत्वपूर्ण वचने घेते, जी पूर्ण एफपीसीएलच्या भावनेमध्ये संमिलित तरतुदींमध्ये समाविष्ट आहेत.
बँक असे घोषित करते व उत्तरदायित्व स्वीकारते की :
- रीटेल कर्जांच्या बाबतीत व्यावसायिक पद्धतीने, कुशलतेने, विनम्रतेने, कष्टपूर्वक आणि त्वरित सेवा देण्यामध्ये धर्म, जात, लिंग, वंश किंवा यांपैकी कुठल्याही आधारे कुठलाही भेदभाव आम्ही करणार नाही.
- कर्ज उत्पादनांच्या जाहिराती आणि प्रचारामध्ये आम्ही निष्पक्ष व प्रामाणिक राहू.
- आम्ही कर्जे देताना त्यासाठीच्या अटी, खर्च, अधिकार व जबाबदाऱ्या योग्यवेळी जाहीर करून त्यानुसार ती ग्राहकांना देऊ करू
- ग्राहकांची इच्छा असल्यास, कर्जविषयक करारांच्या बाबतीत त्यांना सल्ला व साहाय्य आम्ही देऊ करू.
- बँकेमध्ये तक्रारनिवारण कक्षाची स्थापना करून ग्राहकांसोबत कुठलेही विवाद वा मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करू.
- विश्वास सर्व कायदेशीर आवश्यकतांचे अनुपालन करू.
- कर्जाच्या करारांमधील संभाव्य जोखमींबाबत सामान्य जागृतीचा प्रसार करू आणि स्वतंत्र आर्थिक सल्ला घेण्यास व केवळ बँकेने आग्रह केल्यामुळे कृती न करण्यास ग्राहकांना उद्युक्त करू.