यूएई विनिमय ग्रुपचे सदस्य, यूएई विनिमय आणि वित्तीय सेवा लिमिटेड, यांच्या माध्यमातून अभ्युदय सहकारी बँकेने मनीग्राम सोबत जगभरात पैसे पाठवण्याकरता करार केला आहे. यामुळे भारतातील त्यांची सहकारी संस्था मेसर्स मनीग्राम इंटरनॅशनल आयएनसी, यूएसए यांच्या सहकार्याने भारतामध्ये जगभरात पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. अभ्युदय सहकारी बँकेने आपल्या सर्व शाखांमध्ये जगभरात पैसे पाठवण्याकरता मनीग्राम उत्पादनांच्या सेवा देण्यास प्रारंभ केला आहे.
मनीग्राम इंटरनॅशनलबद्दल:
मित्र व कुटुंबातील दूर असलेल्या व्यक्तींना किंवा बँकांशी कमी संबंध येणाऱ्या लोकांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्याकरता मनीग्राम इंटरनॅशनल अनेक पर्याय सादर करते. मनीग्राम इंटरनॅशनल ही एक अग्रगण्य जागतिक वित्तीय सेवा देणारी संस्था उपभोक्त्यांना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात सुरक्षित रितीने पैसे पाठवण्यात साहाय्य करते. ही संस्था तिच्या एजंटांना फक्त 10 मिनटांमध्ये पैसे पोहोचवते. संस्थेच्या जागतिक नेटवर्क मध्ये 1,90,000 एजंट स्थानके आहेत, जी 190 देश आणि प्रांतांमध्ये पसरलेली आहेत. मनीग्रामच्या सुलभ आणि विशाल नेटवर्कमध्ये रीटेलर म्हणून आंतरराष्ट्रीय टपाल कार्यालये आणि वित्तीय संस्थांचा समावेश आहे. एजंट स्थानांवरील निधी हस्तांतरणाविषयी अधिक माहितीकरता www.moneygram.com या संकेतस्थळाला भेट द्या.
प्रक्रियेचा कार्यप्रवाह:
- भारताच्या बाहेर असलेली आणि आपल्या बंधू-मित्रांना सुरक्षितपणे आणि त्वरित रोख पैसे पाठवण्याची इच्छा असलेली प्रेषक व्यक्ती मनीग्रामच्या कुठल्याही एजंटकडे जाते, प्रेषण अर्ज भरते आणि एजंट शुल्कासहीत सममूल्य परकीय चलन सादर करते. अँटी मनी लाँडरींगच्या मार्गदर्शक नियमांनुसार अर्ज भरल्यानंतर प्रेषक भारतात राहणाऱ्या लाभार्थ्याला आठ आकडी संदर्भक्रमांक आणि पाठवलेली रक्कम कळवतो.
- लाभार्थी आमच्या शाखेमध्ये येतो, एक सोपे प्राप्तीपत्र भरतो आणि एक वैध फोटोसहित ओळखपत्र, तसेच आपल्या पत्त्याचा पुरावा सादर करतो.
- माहिती तपासून पाहिली जाते आणि लाभार्थ्याला तात्काळ पैसे दिले जातात.
* एजंटच्या कामकाजाच्या वेळा आणि स्थानिक कायद्यांच्या अधीन