अभ्युदय सहकारी बँकेने आपल्या शाखांमधून जगभरात पैसे पाठवण्याची सुविधा देण्याकरता यूएई विनिमय आणि वित्तीय सेवा लिमिटेड एक्स्प्रेसमनी सोबत करार केला आहे. यूएई विनिमय और वित्तीय सेवाएं लिमिटेड भारतामध्ये एक्स्प्रेसमनी सेवा देण्याकरता यूएई विनिमय केंद्र एलएलसी, अबुधाबी यांची मुख्य प्रतिनिधी आहे.
एक्स्प्रेस मनी ही एक जागतिक तात्काळ निधी हस्तांतरण सेवा आहे, जिच्याद्वारे लोक आपल्या निकटवर्तियांकडून जगभरात कुठूनही काही मिनिटांतच पैसे प्राप्त करू शकतात. तात्काळ निधी हस्तांतरण सेवांमध्ये वेगाने घोडदौड करणारी जागतिक संस्था एक्स्प्रेस मनी पाचही खंडांमधील 100 पेक्षा अधिक देशांमध्ये आणि 50,000 पेक्षा अधिक ठिकाणांवर कार्यरत आहे. या विस्तरित व त्याचबरोबर अनोख्या आणि अव्याहत सेवेमुळे जगातील जवळजवळ कुठल्याही ठिकाणाहून काही मिनिटांतच भारतात पैसे मिळू शकतात. जलदगती, सुरक्षितता आणि सुलभता, या तीन वैशिष्ट्यांमुळे ही सेवा तात्काळ निधी हस्तांतरणामध्ये एक लोकप्रिय ब्रॅण्ड बनली आहे. यात, एक अशी विशेष सोय आहे की, लाभार्थ्याला पैसे मिळताच एसएमएस द्वारे हस्तांतरण झाल्याची माहिती पाठवली जाते. त्यामुळे पुढच्या अधिक खर्चिक क्रिया करण्याची आवश्यकता उरत नाही.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निधी हस्तांतरण सेवेअंतर्गत आमच्या खातेदार आणि बिगर खातेदार ग्राहकांना एक्स्प्रेस मनी सुविधा उपलब्ध आहे. ही सेवा भारतामध्ये एकट्या लाभार्थ्यांना परदेशांतून आलेले पैसे (रु. 50,000/- पेक्षा कमी रक्कम) काही मिनिटांमध्ये मिळण्याची सुविधा देते. ही सेवा अनिवासी भारतीय आणि त्यांचे कुटुंबीय, भारतात आलेले परदेशी पर्यटक, तसेच भारतामध्ये शिक्षणाकरता आलेले परदेशी विद्यार्थी यांच्याकरता एक वरदान आहे. फोटो ओळखपत्र असलेल्या लाभार्थ्याकरता ही एक विनात्रास त्वरित पैसे मिळवून देणारी सेवा आहे.
भारतामध्ये एक्स्प्रेस मनी सेवेचे कामकाज रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खालीलप्रमाणे चालवले जाते
- व्यक्तिगत पैसे पाठवण्याची परवानगी फक्त कुटुंबाची देखभाल आणि भारतामध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठीच आहे
- एक्सप्रेस मनीच्या व्यवहारांकरता कमाल मर्यादा 2500 अमेरिकन डॉलर्स किंवा त्याची सममूल्य रक्कम आहे
- लाभार्थ्याला एका कॅलेंडर वर्षामध्ये फक्त 30 व्यवहार करण्याची परवानगी आहे
लाभ
- भारतभरात विस्तृत नेटवर्क
- काही मिनिटांत रोख रक्कम हातात
- बँकेत खाते असण्याची आवश्यकता नाही
- पैसे प्राप्त करताना कुठलाही आकार देय नाही
- पैसे मिळाल्यानंतर प्रेषक व्यक्तीला एसएमएस संदेश
- काही अडचण आल्यास पूर्ण पैसे परत
एक्स्प्रेस मनीची कार्यप्रक्रिया
प्रेषक परदेशातील एक्स्प्रेस मनी आउटलेटमध्ये एक्स्प्रेस मनी फॉर्म भरून मूळ रक्कम आणि त्यावरील शुल्क सादर करतो.
तपशील प्रणालीमध्ये भरले जातात आणि विशिष्ट 16 आकडी एक्स पिन युक्त पावती त्याला दिली जाते. पैसे पाठवणारा लाभार्थ्याला एक्स पिन कळवतो व त्यानंतर पैसे पाठवले जातात.
लाभार्थी प्राप्ती एजंटकडे जातो, त्वरित प्राप्ती अर्जामध्ये एक्स पिन व अन्य तपशील भरून आपले एक फोटोसहित ओळखपत्र सादर करतो.
या ठिकाणी व्यवहाराची पडताळणी केली जाते, लाभार्थ्याला रोख रक्कम मिळते आणि त्यानंतर प्रेषकाला एसएमएसद्वारे त्याची सूचना मिळते.